उद्यापासून(22 ऑगस्ट) भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. त्याआधी बीसीसीआयने खेळाडूंना त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेक गार्ड(गळ्याच्या सुरक्षा करणारे) असणारे हेल्मेटचे महत्त्व सांगितले आहे. पण नेक गार्ड असलेले हेल्मेट घालायचे की नाही याचा निर्णय खेळाडूंवर सोपवला आहे.
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरचा वेगाने आलेला चेंडू ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या गळ्याच्या जवळ लागला. त्यामुळे त्याला तिसऱ्या ऍशेस सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे.
या घटनेचा विचार करुन बीसीसीआयने भारतीय खेळाडूंनाही नेक गार्ड असलेल्या हेल्मेटचे महत्त्व समजावले आहे. पण बीसीसीआयने अशाप्रकारचे हेल्मेट वापरणे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे खेळाडू त्यांना योग्य आणि आरामदायी असेल ते हेल्मेट वापरु शकतात.
याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकारीने पीटीआयला सांगितले की ‘आम्ही खेळाडूंना नेक गार्ड असलेल्या हेल्मेटबद्दल सांगितले आहे. शिखर धवनसह काही खेळाडू हे हेल्मेट वापरतात. पण आम्ही कोणावर दबाव टाकू शकत नाही. हेल्मेट ही एक खेळाडूंच्या कंफर्टच्या(आरामाच्या) दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे.’
‘जोपर्यंत आयसीसी अशा प्रकारचे हेल्मेट घालणे बंधनकारक करत नाही तोपर्यंत तो खेळाडूंचा निर्णय असेल.’
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरला मिळाला हा मोठा पुरस्कार
–निलंबनातून दिलासा मिळाल्यानंतर श्रीसंतने व्यक्त केली ही खास इच्छा!
–नव्या कसोटी जर्सीत दिसली टीम इंडिया, पहा फोटो