---Advertisement---

आयसीसी स्पर्धांबाबत बीसीसीआयने बदलली ‘ही’ भूमिका, मात्र आता आयपीएल आयोजन येणार अडचणीत

On: रविवार, जून 13, 2021 10:45 PM
Sourav-Ganguly-Jay-Shah-Arun-Dhumal -BCCI-Officials
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने नुकतेच साल २०२४ ते २०३१ पर्यंतच्या आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने यातील कमीत कमी दोन स्पर्धांचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता बीसीसीआयने याबाबत यु टर्न घेतला असून बीसीसीआयचा यावरील दृष्टिकोन वेगळा असल्याचे स्पष्ट केले आहे.

खरंतर आयसीसीने क्रिकेटचा जगभरात जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी अधिकाधिक आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरवले होते. मात्र बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. मात्र आता या तीनही क्रिकेट बोर्डांनी विरोध मागे घेतला असून प्रस्तावाला मान्यता दिली आहे. पण आता यामुळे बीसीसीआयला एका समस्येचा सामना करावा लागू शकतो.

आयपीएल बाबत येऊ शकते अडचण
बीसीसीआयने या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आता त्यांना आयपीएल बाबत मात्र अडचण येऊ शकते. बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की आगामी आयपीएल हंगामांमध्ये संघांची संख्या वाढवण्याचा त्यांचा मानस आहे. २०२२ सालच्या हंगामात दोन नवीन संघांचा बीसीसीआय समावेश करणार आहे. अशा परिस्थितीत हंगाम आयोजित करण्यासाठी दोन नाही तर जवळपास तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक असेल. पण आयसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून आयपीएलसाठी वेळ काढणे, हे बीसीसीआय समोर आता मोठे आव्हान असेल.

गांगुलीने केला होता विरोध
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने खरंतर यापूर्वीच आयसीसीच्या प्रस्तावाचा विरोध केला होता. त्यावेळी बोलतांना गांगुली म्हणाला होता की, “आयुष्यात काही गोष्टी कमी प्रमाणात असतात तेव्हाच त्यांची मजा असते. फुटबॉल विश्वचषक चार वर्षांतून एकदाच होतो. त्यावेळी त्यासाठी चाहत्यांचा उत्साह पाहण्याजोगा असतो. त्यामुळे आपल्याला स्पर्धांची संख्या वाढवताना सावधान राहणे गरजेचे आहे. अर्थात आयसीसीला याबाबत अंतिम निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी आत्ता काही टिप्पणी करणार नाही. ज्यावेळी मला योग्य ठिकाणी मत मांडण्याची संधी मिळेल, तेव्हा मी याबाबत विस्तृतपणे बोलेल.”

मात्र आपली ही पूर्वीची भूमिका बदलून बीसीसीआयने आता आयसीसीच्या प्रस्तावाला असलेला विरोध मागे घेतला आहे. परंतु त्यामुळे निर्माण होणार्‍या अडचणींवर बीसीसीआय कशी मात करणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

रेकॉर्डब्रेकर जिमी! वॅग्नरला बाद करताच मोडीत काढला मॅकग्राचा ‘तो’ विक्रम

पहिल्या ६७ वर्षांत भारताने परदेशात जिंकल्या आहेत होत्या केवळ १३ कसोटी, कोहलीने ६ वर्षांत जिंकवल्या १५

केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---