मंगळवारी (18 ऑक्टोबर) बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवीन अध्यक्ष बनले, तर जय शहा बोर्डाच्या सचिवपदावर कायम आहेत. सौरव गांगुली मागच्या तीन वर्षांपासून बीसीसीआय अध्यक्षपद सांभाळत होते, पण आता त्यांच्या जागी बिन्नी यांची नियुक्ती केली गेली आहे. शहा पुन्हा एकदा सचिव नबल्यानंतर त्यांनी आगामी आशिया चषकाविषयी मोठे विधान केले. आता रॉजर बिन्नींकडून देखील आशिया चषक 2022 विषयी मोठी प्रतिक्रिया आली आहे.
बीसीसीआयच्या सचिवपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाल्यानंतर जय शहा (Jay Shah) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुढच्या वर्षीचा आशिया चषक खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तान दौरा करणार नाही. जय शहांच्या या वक्तव्यानंतर आशिया चषक 2022 चे यजमानपद भूषवणाऱ्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. जर आशिया चषक पाकिस्तानमध्ये खेळला गेला नाही, तर बोर्डाला नक्कीच मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. शहांच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी () स्वतः देखील व्यक्त झाले आहेत. बिन्नींच्या मते संघाने पाकिस्तानमध्ये जायचे की नाही, हा निर्णय सरकारचा असेल. बोर्ड यात काहीच करू शकत नाही.
सौरव गांगुलींच्या कार्यकाळात भारताने अनेक महत्वाच्या मालिका जिंकल्या आणि कोरोनाकाळात देखील क्रिकेटचे सामने आयोजित केले. आता बिन्नींकडून देखील सर्वांना अशाच कामाची अपेक्षा आहे. आशिया चषक 2022 विषयी बोलताना रॉजर बिन्नी म्हणाले की, “वृत्तसंस्था एएनआयसोबत बोलताना रॉजर बिन्नी म्हणाले की, हा आमचा कॉल (निर्णय) नाहीये. आमचा संघ याठिकाणी जाईल की नाही, हे आम्ही सांगू शकत नाही. जर तुम्ही देश सोडणार असाल, किंवा दुसरे संघ याठिकाणी येणार असतील, तर सरकारकडून परवानगी घ्यावी लागते. आम्ही हा निर्णय स्वतःच्या मानाने घेऊ शकत नाही. आम्हाला सरकारवर अवलंबून राहावे लागते.”
दरम्यान, बीसीसीआय सचिवांनी केलेल्या आशिया चषक 2022 विषयी दिलेल्या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील यावर प्रत्युत्तर दिले आहे. आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक पुढच्या वर्षी भारतात खेळला जाणार आहे. जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये येणार नसेल, तर पाकिस्तान देखील पुढच्या वर्शी विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, असे पीसीबीकडून सांगितले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हार्ट ट्रान्सप्लान्ट झालेल्या महिला चाहतीने काढले धोनीचे स्केच, ‘माही’ म्हणाला, ‘हे हृदयस्पर्शी’
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत इशान किशनने दाखवला जलवा, ठोकलं वादळी शतक