येत्या ९ एप्रिलपासून भारतात आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी खेळवण्यात येणार आहे. ही टी-२० स्पर्धा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा देखील भारतातच होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. याचे उत्तर आता बीसीसीआयने दिले आहे.
टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२० मध्येच होणार होती. परंतु कोरोना असल्या कारणाने ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ही स्पर्धा भारतात होणार आहे याची घोषणा झाल्यापासून पाकिस्तान संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाला होता की, पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही?. याबाबत बीसीआयने स्पष्टीकरण दिले आहे की टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआय पाकिस्तान संघासाठी व्हिसा उपलब्ध करून देईल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे लिखित स्वरूपात आश्वासन मागितले होते की, खेळाडू, प्रेक्षक, पत्रकार आणि अधिकाऱ्यांसाठी भारतात येण्यासाठी व्हिसा मिळेल. पाकिस्तान संघाला २०१६ मध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात आला होता. तसेच २०१२ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वीपक्षिय मालिका झाली होती. त्यानंतर ते दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आमने सामने आले आहेत.
पाकिस्तान संघ टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला; तर भारतीय प्रेक्षकांना हाय व्होल्टेज सामना पहायला मिळू शकतो. भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकदाच पाकिस्तान संघाकडून पराभूत झाला आहे.
भारतीय संघाने २००७ मध्ये झालेल्या पहिल्या वहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय संघाला एकदाही विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात यश आले नाही. यंदा ही स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! कोरोनाची बाधा झालेला सचिन रुग्णालयात भरती, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
पाच महान भारतीय क्रिकेटर, ज्यांना विश्वचषकाचा एकही सामना खेळण्याची मिळाली नाही संधी
कधीही विश्वचषक विजेतेपद नशीबात न आलेले ५ भारतीय महान क्रिकेटर्स