वनडे क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या आठवड्यात अनेक रोमांचक सामने झालेले पाहायला मिळत आहेत. असे असले तरी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर आहे. 14 ऑक्टोबर रोजी हा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. मात्र, या सामन्यात भारतीय संघ आपल्या पारंपारिक निळ्या जर्सीत न उतरता भगव्या जर्सीत उतरणार अशी चर्चा सुरू आहे. आता या प्रकरणावर भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे खजिनदार आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वचषकातील सर्वात मोठा सामना मधून भारत आणि पाकिस्तान या सामन्याकडे पाहिले जातेय. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी हा सामना होईल. या सामन्यात भारतीय संघ भगव्या जर्सीत उतरणार आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, आता बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांनी याबाबत बोलताना म्हटले,
“आम्ही अत्यंत स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की भारतीय संघ भगव्या जर्सीमध्ये खेळणार नाही. भारतीय संघ निळी जर्सी सोडून कोणतीही जर्सी सामन्यात घालणार नाही. या सर्व अफवा आहेत. आपण आत्तापर्यंत निळ्या रंगाच्या जर्सीत खेळलोय आणि त्यामध्येच खेळू.”
सध्या भारतीय संघाची प्रॅक्टिस जर्सी ही भगव्या रंगाची आहे. त्यामुळे अनेक जण असे दावे करत होते. इंग्लंड विरुद्ध भगव्या आणि गडद निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. मागील विश्वचषकात होम आणि अवे असे पर्याय उपलब्ध असल्याने भारतीय संघाने ती जर्सी वापरलेली.
(BCCI Confirmed India Not Wearing Saffron Jersey Against Pakistan In World Cup Match)
महत्वाच्या बातम्या –
सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटचा Gold Medal ने सन्मान, पण का दिले पदक? पाहा व्हिडिओ
टॅलेंटेड रचिनचा टॉप फॉर्म कायम! सलग दुसऱ्या सामन्यात चोपली विरोधी गोलंदाजी, केल्या इतक्या धावा