नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने शनिवारी (१५ ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकला होता. त्यानंतर त्याच्याबद्दल अनेक दिग्गजांनी आपापली मते मांडायला आणि शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे. यांमध्ये पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनीही धोनीच्या निवृत्तीनंतर आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात आता पाकिस्तानचे माजी दिग्गज फिरकीपटू सकलेन मुश्ताक यांचाही समावेश झाला आहे. त्यांनी धोनीला चॅम्पियन खेळाडू सांगत म्हटले की, या दिग्गजाने आपला निरोप सामना नक्कीच खेळायला पाहिजे होता. आणि मैदानावरूनच निवृत्ती घ्यायला हवी होती.
मुश्ताक यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटले, “हा बीसीसीआयचा पराभव आहे की, इतक्या महान व्यक्तिमत्त्व असलेल्या खेळाडूशी त्यांनी योग्य व्यवहार केला नाही. बीसीसीआयसाठी असे बोलताना दु:ख होत आहे की, त्यांनी धोनीसारख्या दिग्गज खेळाडूला निरोप सामना दिला नाही. धोनी याचा हक्कदार होता.”
त्यांनी पुढे म्हटले की, “मला वाटते की त्याचे करोडो चाहते आहेत आणि त्या सर्वांची अशी इच्छा असेल की त्यांच्या हिरोला मैदानावर शेवटचे भारतीय संघाच्या कपड्यांमध्ये फलंदाजी करताना मैदानातून निरोप घेताना पाहता येईल.”
“धोनीने घेतलेली अशाप्रकारची निवृत्ती चांगली वाटली नाही. परंतु तरीही त्याला शुभेच्छा! त्याला आपल्या भविष्यात जे करायचे आहे त्या गोष्टीत त्याला यश मिळो,” असे मुश्ताक पुढे बोलताना म्हणाले.
मुश्ताकने धोनीची प्रशंसा करताना म्हटले की, “तो शांत स्वभावाचा दिग्गज क्रिकेटपटू होता, ज्याचा मैदानावर खूप प्रभाव राहिला. तो एक नम्र स्वभाव, विचारवंत, योद्धा आणि खेळाचा खरा राजदूत होता. त्याच्याबद्दल हे सर्व विशेषणे योग्य ठरतात. त्याने भारतीय संघासाठी जे काही केले आहे, ते येणाऱ्या काही वर्षांपर्यंत लक्षात ठेवले जाईल.”
धोनीने स्वातंत्र्यदिना दिवशी सायंकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनीने आपल्या भारतीय संघाकडून आपल्या कारकिर्दीत एकूण ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १७ हजार पेक्षाही अधिक धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने एकूण १६ शतके ठोकली आहेत
महत्त्वाच्या बातम्या-
-बीसीसीआयने धोनीला असा काही झटका दिला की त्याला निवृत्तीचाच घ्यावा लागला निर्णय
-…म्हणून धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले, सौरव गांगुलीने केला खुलासा
-सानिया मिर्झा म्हणते, एमएस धोनीमधले बरेच गुण शोएब मलिकसारखे
ट्रेंडिंग लेख-
-अझर अली असा मोठा कारनामा करणारा पाकिस्तानचा पाचवाच फलंदाज
-जेव्हा सीएसकेने आरसीबीला पराभूत करत जिंकले होते सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद…