भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाला (सीसीआय) जिम उपकरणांसाठी 2.25 कोटी रुपये देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. आता ही रक्कम त्यांनी संस्थेला दान केलेली आहे. सध्याच्या आणि माजी खासदारांद्वारे “संवादाचे व्यासपीठ” म्हणून वापरला जाणारा हा क्लब दिल्लीतील विठ्ठल भाई पटेल हाऊस येथे आहे.
डिसेंबर 2022 रोजी झालेल्या अपेक्स बैठकीत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, सीसीआयने स्वतः जिम उपकरणे खरेदीसाठी निधी मागितला होता. बीसीसीआयने सीसीआयला 2.25 कोटी रुपयांची एकरकमी देणगी मंजूर केल्याची माहिती आता त्यांनी दिली.
भारतीय संविधान सभेच्या सदस्यांना सामाजिक संपर्क वाढवण्याच्या आणि क्लबच्या जीवनातील सामान्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने फेब्रुवारी 1947 मध्ये हा क्लब सुरू करण्यात आला होता.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे या क्लबचे अध्यक्ष आहेत. हरिवंश सिंग सरचिटणीस असून, केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी हे उपाध्यक्ष आहेत. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला क्लबचे क्रीडा सचिव आहेत.
(BCCi Donate 2.27 Crore To Constitution Club Of India BCCI Secretary Jay Shah Annouced)
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघात खळबळ! दिग्गज खेळाडूने संघाशी तोडला संबंध, अमेरिकडून मिळाली ऑफर
‘आम्ही दोन दिवसात…’, विश्वचषक तयारीविषयी भारतीय कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया