अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगला मुहूर्त सापडला आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात ही बहुप्रतिक्षित लीग सुरू होईल. या लीगची अधिकृत घोषणा मागील महिन्यात करण्यात आली होती. त्यानंतर आता बीसीसीआयला या स्पर्धेतून मोठ्या कमाईची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पुरुष आयपीएलनंतर महिला आयपीएल देखील बीसीसीआयची तिजोरी भरणार असल्याचे दिसतेय.
बीसीसीआयने महिला आयपीएलची घोषणा केल्यानंतर जवळपास सर्वच आयपीएल फ्रॅंचाईजींनी आपण या लीगसाठी उत्सुक असल्याचे म्हटलेले. त्यामुळे कोणत्या फ्रॅंचाईजी महिला आयपीएलमध्ये गुंतवणूक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका प्रमुख वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय महिला आयपीएलच्या संघांसाठी लवकरच निविदा मागविणार आहे. एका फ्रॅंचाईजीची आधारभूत किंमत ही 400 कोटी असेल. बीसीसीआयला आशा आहे की, एका आयपीएल फ्रॅंचाईजीकडून बीसीसीआयच्या तिजोरीत 1200 ते 1500 कोटी रुपये मिळू शकतात.
महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाच संघ खेळताना दिसतील. हे पाच संघ शक्यतो विभाग वार असण्याची शक्यता आहे. तसेच, सध्या आयपीएलमध्ये ज्या शहरांच्या फ्रेंचायजी आहेत, त्या शहरांव्यतिरिक्त फ्रेंचाइजी दिली जाऊ शकते. तसेच स्पर्धेचे सामने हे शक्यतो सेकंड टियर शहरांमध्ये खेळवले जातील. यासोबतच अंतिम 11 खेळाडूंमध्ये 5 विदेशी खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. यापैकी एक खेळाडू सहयोगी देशांची असेल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.
बीसीसीआय प्रथमच महिला आयपीएल आयोजित करत असली तरी वुमन्स टी20 चॅलेंज ही तीन संघांची स्पर्धा आयोजित करत आली आहे. आयपीएलच्या चार हंगामा दरम्यान ही स्पर्धा खेळली गेली होती.
(BCCI expects Women’s IPL franchises to be sold between 1000 crore to 1500 crore)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अरे, हे काय बोलून गेला इंग्लंडचा कोच! मॅक्युलम म्हणाला, ‘पाकिस्तानविरुद्ध हरलो तरी चालेल…’
विराट कोहली विरुद्ध तू असा सामना झाला तर कोण जिंकेल? सूर्या म्हणाला, ‘अर्थातच…’