---Advertisement---

महिला आयपीएल २०२१ स्थगित, पण स्म्रिती मंधानासह ३ भारतीय क्रिकेटर गाजवणार ‘ही’ लीग

On: बुधवार, मे 5, 2021 12:59 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ स्पर्धेत कडक बायो बबल असून देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतील साखळी सामने संपल्यानंतर येत्या २३ मे पासून प्लेऑफ सामन्यांना प्रारंभ होणार होता. याचदरम्यान महिलांची आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार होती. परंतु कोरोनामुळे महिला आयपीएल सुरू होण्याआधीच रद्द झाली आहे. आता आयपीएल २०२१ मध्ये सहभागी होणाऱ्या महिला क्रिकेटपटूंपैकी काही क्रिकेटपटू दुसऱ्या मोठ्या लीग स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि ३ महिला क्रिकेटपटूंना ब्रिटन मध्ये होणाऱ्या ‘हंड्रेड’ स्पर्धेसाठी पोचपावती दिली आहे. या ४ खेळाडूंमध्ये सलामी फलंदाज स्म्रिती मंधना आणि दीप्ती शर्मा यांचा देखील समावेश आहे. तसेच चौथ्या खेळाडूचे नाव अजूनही गुपित आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला म्हटले की, “हरमनप्रीत, स्म्रिती, दीप्ती आणि आणखी एक खेळाडू आहे ज्यांना ही लीग स्पर्धा खेळण्याची अनुमती देण्यात आली आहे.” भारतीय महिला संघ जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १६ जून रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात एकमात्र कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दोन्ही संघामध्ये ३ वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत.

ही १०० चेंडूची स्पर्धा २१ जुलै २०२१ पासून सुरू होणार आहे. तसेच संघात निवड झालेल्या खेळाडूंना येत्या २७ मार्च रोजी रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, महिला खेळाडूंना २७ मे रोजी रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. हरमनप्रीत, मंधना आणि जेमिमा रोड्रिग्सने २०१९ मध्ये झालेल्या सुपर लीग स्पर्धेत देखील प्रतिनिधित्व केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

एकीकडे कोरोनाने घेरले, दुसरीकडे फ्रँचायझीने पूर्णवेळ बाकावर बसवले; ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल २०२१ दुर्दैवी ठरले!

आयपीएल २०२१: कोरोनावर मात आणि मैदानावर दमदार प्रदर्शनाची छाप, ‘या’ ४ धुरंधरांची बातच न्यारी

आयपीएल २०२१ मधील अनोखे पण शानदार विक्रम, जे तुम्हाला फारसे माहितही नसतील; वाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---