बीसीसीआयने सध्या इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात बदल केला आहे. टीम इंडियाचा संयमी फलंदाज केएल राहुल दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर पडला आहे. तर चौथ्या सामन्यातील विश्रांतीनंतर उपकर्णधार जसप्रीत बुमराह याचं पुनरागमन झालं आहे. याबरोबरच बीसीसीआयने मोहम्मद शमी याच्याबाबतही मोठी माहिती दिली आहे.
मोहम्मद शमी याच्यावर 26 फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया पार पडली आहे. तसेच शमीने सोशल मीडियावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती देखील दिली होती. तर शमीला आयसीसी वर्ल्ड कप 2023 दरम्यान दुखापत झाली होती. तेव्हापासून शमी भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच घोट्याच्या दुखापतीमुळे शमी आयपीएलमधूनही बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशात बीसीसीआयने मोठी अपडटे दिली आहे.
याबरोबरच बीसीसीआयने मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत सांगितले आहे की, “मोहम्मद शमीच्या उजव्या टाचांच्या समस्येवर 26 फेब्रुवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर शमी आता बरा होत आहे, तो लवकरच रिहॅबला सुरुवात करेल. त्यासाठी शमी बंगळुरूतील एनसीएत लवकरच रवाना होईल.”
Just had a successful heel operation on my achilles tendon! 👟 Recovery is going to take some time, but looking forward to getting back on my feet. #AchillesRecovery #HeelSurgery #RoadToRecovery pic.twitter.com/LYpzCNyKjS
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) February 26, 2024
दरम्यान, आता शमी आयपीएलमध्ये खेळणार की थेट टी 20 वर्ल्ड कपसाठीच फिट होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. तसेच मोहम्मद शमीला ही दुखापत वनडे वर्ल्डकप 2023 दरम्यान झाली होती. त्यावेळी त्याला मैदानावर उभं राहण्यासाठी सातत्याने इंजेक्शन्स घ्यावी लागत होती.
टेस्ट सीरजसाठी भारतीय संघ | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024 : RCBसाठी आनंदाची बातमी! आयपीएलपूर्वी कॅमेरॉन ग्रीनने झळकावले दमदार शतक
- IPL 2024 : आयपीएलपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने केली मोठी घोषणा, कृणाल पांड्याऐवजी ‘या’ धाकड फलंदाजाला केले उपकर्णधार