आसामचे माजी क्रिकेटपटू सुभाषदीप घोष भारतीय महिला संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. ३४ प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए सामन्यांमध्ये घोषने चार अर्धशतकांसह ६२३ धावा केल्या. उजव्या हाताचा फलंदाज आपल्या छोट्या कारकिर्दीत रेल्वेसाठी देखील खेळला. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी अमोघ पंडित असतील. ज्यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, मंगळवारी अखिल भारतीय वरिष्ठ महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि अनेक टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी दोन वेगवेगळ्या संघांची घोषणा केली आहे. सध्या महिला खेळाडू बेंगळुरू येथील प्रशिक्षण शिबिराचा एक भाग आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यानंतर त्यांना अनिवार्य विलगीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
“अमोघ प्रशिक्षक म्हणून काम करत असताना सुभाषदीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी आहे आणि दीर्घ मुदतीच्या भेटीचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल,” असे सूत्राने सांगितले.
यास्तिका भाटिया, मेघना सिंग आणि रेणुका सिंह ठाकूर हे संघात नवीन चेहरे आहेत. जेमीमाह रोड्रीग्स, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा, जे सर्व द हंड्रेड टूर्नामेंटमध्ये खेळले आणि त्यांना देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्थान मिळाले आहे. इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर स्नेह राणाने संघातील आपले स्थान कायम ठेवले आहे.
प्रिया पुनिया, इंद्राणी रॉय, राधा यादव इंग्लंडमध्ये खेळल्या. मात्र, त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळण्यात आले आहे. भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाला पोहोचणार आहे.
एकमेव कसोटी सामना आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पुनम राऊत, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झुलन गोस्वामी, मेघना सिंग, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, एकता बिष्ट.
टी २० मालिकेसाठी संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यास्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंग, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, रिचा घोष, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव, रेणुका सिंह ठाकूर.
महत्त्वाच्या बातम्या –
भारीच! १४४ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात ‘असा’ कारनामा करणारा बटलर दुसराच यष्टिरक्षक
भारताच्या ‘या’ दिग्गजाला फोन करुन मदत माग, सातत्याने अपयशी ठरणाऱ्या विराटला गावसकरांचा सल्ला
भारतासाठी डोकेदुखी ठरत असलेला रुट आता मियाँदादचा ‘हा’ मोठा विक्रमही काढू शकतो मोडीत





