आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत बोर्ड कोणता, असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून फक्त एकच नाव येईल. ते म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय होय. बीसीसीआय सर्वात श्रीमंत बोर्डामध्ये अव्वलस्थानी येते. भारतीय संघाचे टी20 विश्वचषकातील प्रदर्शन कसेही असले, तरी मोठमोठ्या कंपन्या भारताशी जोडण्यासाठी उत्सुक असतात. मागील काही वर्षांमध्ये बीसीसीआयवर पैशांचा एवढा पाऊस पडला की, सर्वत्र याची चर्चा रंगली. विशेष म्हणजे, बीसीसीआयने मागील वर्षी सर्वात जास्त पैसा कमावला. चला तर इतर देशांच्या तुलनेत बीसीसीआयने किती रुपये कमावले, जाणून घेऊया…
दहा देशांच्या यादीत सर्वात शेवटच्या स्थानी श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Sri Lanka Cricket Board) आहे. श्रीलंकन बोर्डाने 2021मध्ये एकूण 100 कोटी रुपये कमावले होते. नवव्या स्थानी झिम्बाब्वे बोर्ड असून त्यांनी 113 कोटी रुपये कमावले होते. याव्यतिरिक्त आठव्या स्थानी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आहे. वेस्ट इंडिजने 2021मध्ये 116 कोटींची कमाई केली. तसेच, या सर्वांच्या पुढे न्यूझीलंड आहे. सातव्या स्थानावरील न्यूझीलंड बोर्डाने 2021मध्ये तब्बल 210 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सहाव्या स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सन 2021मध्ये 485 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, पाचव्या स्थानावर असलेल्या बांगलादेशने न्यूझीलंडलाही मागे टाकले. बांगलादेशने 2021मध्ये तब्बल 802 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावरून दिसते की, बांगलादेश क्रिकेट आर्थिकदृष्ट्या इतर देशांपेक्षा जास्त सुदृढ आहे. यानंतर चौथ्या स्थानी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (Pakistan Cricket Board) असून त्यांनी 2021मध्ये 811 कोटींची कमाई केली आहे.
बीसीसीआय अव्वलस्थानी
सन 2021मध्ये सर्वाधिक पैसा कमावणाऱ्या पहिल्या तीन देशांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांचा समावेश आहे. बीसीसीआय (BCCI) जरी अव्वल तीनमध्ये अग्रस्थानी असला, तरी दुसऱ्या स्थानी क्रिकेट ऑस्ट्रेलिया असून त्यांनी 2021मध्ये 2843 कोटी कमावले होते. तिसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2021मध्ये 2135 कोटी रुपयांची कमाई केली होती. बीसीसीआयच्या वार्षिक कमाईबद्दल बोलायचं झालं, तर बीसीसीआयने 2021मध्ये तब्बल 3730 कोटी रुपयांची कमाई केली होती. यावरून समजते की, बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. (bcci got this much revenue in last year pakistan is not even near around read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितने फिटनेसचे घेतले मनावर, वर्ल्डकप हारुन आल्यावर लगेच सुरू केली रनिंग
‘मी स्वप्नातही सूर्यकुमारसारखे शॉट मारू नाही शकत’, न्यूझीलंडच्या दिग्गज फलंदाजाची कबुली