अलीकडेच भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला. हा न्यूझीलंडचा ऐतिहासिक विजय ठरला. भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर आपल्याच भूमीवर कसोटी मालिका गमावली. भारताच्या पराभवावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पराभवानंतर बीसीसीआयची (BCCI) मॅरेथॉन मीटिंग झाली. जवळपास 6 तास चाललेल्या मॅरेथॉन मीटिंगला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) निशाण्यावर दिसले.
6 तास चाललेल्या या मॅरेथाॅन मीटिंगला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसह (Gautam Gambhir) बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) आणि अध्यक्ष रॉजर बिन्नीही (Roger Binny) उपस्थित होते.
बीसीसीआयने (BCCI) न्यूझीलंडविरूद्धच्या 3-0 अशा पराभवावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत मुंबई कसोटीसाठी टर्नरची निवड, जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) विश्रांती आणि गौतम गंभीरची (Gautam Gambhir) कोचिंग शैली या मुद्द्यांवर चर्चा झाली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामुळे गौतम गंभीरने बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली.
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “ही 6 तासांची मॅरेथॉन बैठक होती, जी अशा पराभवानंतर ठरली होती. भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे आणि संघ पुन्हा व्यवस्थित मार्गावर येण्याची खात्री बीसीसीआयला करायची आहे. याविषयी गंभीर-रोहित-आगरकर काय विचार करत आहेत हे बीसीसीआयला जाणून घ्यायचे आहे.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बैठकीत जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) अनुपस्थितीबाबत चर्चा झाली. याशिवाय, या खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करत नसतानाही भारताने रँक टर्नरची निवड करणे यासारख्या काही समस्या आहेत. ज्यावर चर्चा झाली. भारतीय संघाला पहिल्या 2 कसोटीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर तिसरी कसोटी मुंबईत खेळली जाणार होती. भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) रोजी होणार आहे. दोन्ही संघातील पहिला सामना पर्थच्या मैदानावर रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs SA; झंझावाती शतक झळकावून संजू सॅमसनने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू
मरता-मरता वाचला हा दिग्गज क्रिकेटपटू, ऑस्ट्रेलियात घडला जिवघेणा अपघात!
पूना क्लब ओपन गोल्फ स्पर्धेत करणदीप कोचर आणि क्षितिज नावेद कौल यांची संयुक्त आघाडी कायम