---Advertisement---

पर्याय नाही म्हणून द्रविड! आगामी टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयचा होता वेगळाच प्लॅन

On: बुधवार, नोव्हेंबर 29, 2023 5:22 PM
Rahul Dravid
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ नुकत्याच पार पडलेल्या वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यात भिडले होते. विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मात मिळाली. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघासोबतचा कार्यकाळ विश्वचषकासोबतच संपला होता. अशातच आता माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याच्याबाबतीत महत्वाची माहिती समोर येत आहे.

भारतीय संघ वनडे विश्वचषक 2023 मध्ये पराभूत झाला. पण संघाचे विश्वचषक अभियानातील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले. सुरुवातीच्या 10 पैकी 10 सामने भारताने जिंकले होते. पण अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागला. संघाच्या याशामध्ये नेहमी मागे राहणारा राहुल द्रविड (Rahul Dravid) पराभवानंतर मात्र जबाबदारी घेत पत्रकार परिषदेसाठी हजर होता. बीसीसीआयने बुधवारी (29 नोव्हेंबर) द्रविडचे संघाला मिळालेल मार्गदर्शन आणि योगदान लक्षात घेत मुख्य प्रशिक्षक म्हणून त्याचा कार्यकाळ वाढवला.

असे असले तरी, आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय वेगळा विचार करत होती, असे दिसते. माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआयने भारताच्या टी-20 संघासाठी आशीष नेहरा (Ashish Nehra) याला मुख्य प्रशिक्षक बनवण्याचा विचार केला होता. बोर्डाकडून नेहराला या पदासाठी प्रस्ताव देखील दिला गेला. पण माजी वेगवान गोलंदाजाने हा प्रस्ताव नाकारला, असे सांगितले जात आहे. अशात नेहरा उपलब्ध नसल्याने बोर्डाकडून द्रविडचा कार्यकाळ आगामी टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवला गेला आहे.

दरम्यान, आशीष नेहरा मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये गुजरात टायटन्स संघाचा प्रशिक्षक राहुला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 हंगामात गुजरात टायटन्स संघ नव्याने सामील झाला. आपल्या पहिल्याच हंगामात गुजरातने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकली. संघाच्या या विजयात मुख्य प्रशिक्षक आशीष नेहरा याचे मोलाचे योगदान होते. नेहराच्या कोचिंग स्टाईलचेही चांगलेच कौतुक झाले होते. याच कारणास्तव बीसीसीआयकडून त्याला भारतीय टी-20 संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा केली गेली असावी. पण हा प्रस्ताव नेहराने नाकारल्यामुळे आगामी आयपीएल हंगामात देखील तो गुजरातच्या प्रशिक्षकपदी कायम असेल. (BCCI had proposed Ashish Nehra before retaining Rahul Dravid as a head coach)

महत्वाच्या बातम्या – 
विराटविना दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार टीम इंडिया! रोहितबाबतही महत्त्वाचे अपडेट, वाचा सविस्तर
‘सूर्यकुमारच्या ‘या’ चुकीमुळे भारत हरला’, तिसर्‍या टी20 सामन्यातील पराभवानंतर भारतीय दिग्गजाचं वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---