शुक्रवारी (30 डिसेंबर) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत अपघातग्रस्त झाला. आईला सरप्राईज देण्यासाठी पंत शुक्रवारी पहाटे दिल्लीहून रुरकीला निघाला होता. पण वाटेत त्याचा भीषण अपघात झाला. अफघातात पंतला गंभीर दुखापत झाली असून आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पंतच्या या दुखापतीनंतर भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने देखील सविस्तर माहिती दिली आहे. बीसीसीआयये पंतच्या तब्यतिची माहिती देण्यासाठी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, “भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी पहाटे उत्तराखंडच्या रुरकीजवळ अपघातग्रस्त झाला. त्याला सक्षम हॉस्पिटल आणि मल्टिस्पेशालिटी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले गेले आणि त्याठिकाणी अपघातात झालेल्या जखमांवर उपचार केले गेले.”
“त्याच्या कपाळावर दोन जखमा आहेत. उजव्या गुडघ्याचे लिगामेंट फायले आहे. तसेच उजव्या हाताचे मनगट, घोट्याला आणि पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. पंतच्या पाठीवर अनेक ओरखडे आणि जखमा झाल्या आहेत. असे असले तरी, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. आता त्याला डेहराडून मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याठिकाणी त्याचा एमआरआय केला जाईल आणि उपचारांची पुढची दिशा ठरवली जाईल.”
“बीसीसीआय रिषभ पंतच्या कुटुंबाच्या सतत संपर्कात आहे. तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या हॉक्टरांसोबद देखील बीसीसीआयची चर्चा सुरू आहे. रिषभला सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे आणि त्याला या दुखापतीच्या काळातून बाहेर येण्यासाठी बोर्ड आवश्यक ते सर्प सहकार्य देखील करत आहे,” असेही बोर्डाकडून सांगितले गेले आहे.
Media Statement – Rishabh Pant
The BCCI will see to it that Rishabh receives the best possible medical care and gets all the support he needs to come out of this traumatic phase.
Details here 👇👇https://t.co/NFv6QbdwBD
— BCCI (@BCCI) December 30, 2022
दरम्यान, माध्यमांतील वृत्तांमध्ये असेही सांगितले गेले आहे की, पंतची दुखापत गंभीर असल्यामुळे पुढचा एक वर्षाचा काळ तो मैदानातून बाहेर राहू शकतो. पण अध्याप याविषयी कुठलीही ठोस माहिती समोर येऊ शकली नाहीये. भारत आणि श्रीलंक यांच्यातील टी-20 आणि वनेड मालिकेत पंत खेळणार नाहीये. उभय संघांतील या मालिका जानेवारी 2023 मध्ये खेळल्या जाणार असून निवडकर्त्यांनी पंतल्या या मालिकांमधून विश्रांती दिली होती.
भारताला फेबुर्वारी आणि मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळायची आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला या मालिकेत मोठा विजय मिळवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पंत भारतासाठी मॅच विनर ठरू शकत होता. पण दुखापतीमुळे आता पंत या मालिकेत शक्यतो खेळू शकणार नाही. भारतात आयसीसी वनडे विश्वचषक 2023 चे आयोजन केले जाणार असून या महत्वाच्या स्पर्धेतून देखील पंतला माघार घ्यावी लागू शकते. (BCCI has given a major update on Rishabh Pant’s fitness)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: डिवायडरला धडकून हवेत उडाली कार! रिषभ पंतच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
‘तो’ दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते