---Advertisement---

आयपीएल २०२०चे वेळापत्रक बीसीसीआयने केले तयार; आता प्रतिक्षा फक्त संघांच्या मंजूरीची…

---Advertisement---

नवी दिल्ली। येत्या रविवारी (२ ऑगस्ट) आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलची बैठक होणार आहे. या बैठकीत या वर्षी यूएईमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या आयपीएल २०२०च्या वेळापत्रकाला अंतिम रूप दिले जाईल. यामध्ये आयपीएलच्या ८ संंघांना होणाऱ्या समस्या, मानक प्रणाली आणि संपूर्ण वेळापत्रकाबाबत चर्चा होईल.

आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान यूएईमध्ये होणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे. परंतु कोणता सामना केव्हा होईल याची मात्र माहिती अद्याप दिलेली नाही. तरीही, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे आणि संघांसमोर ते ठेवण्यात येईल. यानंतरच त्याची अधिकृतरीत्या घोषणा केली जाईल.

असे म्हटले जात आहे की, २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलच्या (IPL Governing Council) बैठकीत याची अधिकृत घोषणा केली जाईल.

बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितले की, बैठकीदरम्यान सर्व ८ फ्रंचायझी संघांना स्पर्धेच्या पद्धतींबाबत स्पष्ट गोष्टी मिळतील. या बैठकीनंतर मानक प्रणालीही फ्रँचायझींना देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. या बैठकीत बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याव्यतिरिक्त आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेलही सहभागी होणार आहेत. त्यात विविध भागधारकांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.

गांगुली व शहा यांचा बीसीसीआयमधील कार्यकाळ संपुष्टात आला आहे. परंतु या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात लोढा समितीच्या कूलिंग ऑफ पिरियड (विश्रांती) अटींमध्ये शिथिलता देण्यासाठी अपील केली आहे. त्यावर १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

सामन्यांचे आयोजन मोकळ्या स्टेडिअममध्ये केले जाईल तसेच फ्रंचायझी संघांना तिकिटांमधून मिळणाऱ्या निधीच्या नुकसानीवरही चर्चा केली जाईल. खेळाडूंकडून फ्रंचायझींना प्रश्न विचारले जात आहेत की ते आपल्या कुटुंबांना सोबत घेऊन जाऊ शकतात की नाही, यावरही चर्चा केली जाईल.

गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची अपेक्षा

बीसीसीआयला क्रीडा मंत्रालयाकडून (Ministry of Sports) आयपीएलसाठी हिरवा सिग्नल मिळाला आहे. परंतु गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने म्हटले की, गृह मंत्रालय (Ministry of Home Affairs) आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून (Ministry of Foreign Affairs) आयपीएलच्या आयोजनाबाबत परवानगी मिळेल. तरीही यूएईशी भारत सरकारचे संबंध चांगले आहेत, त्यामुळे असे म्हटले जात आहे की, आयोजनाच्या बाबतीत कोणतीही समस्या होणार नाही. यापूर्वी २०१४ साली आयपीएल लीगच्या २० सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-एलिसा पेरीच्या घटस्फोटनंतर का ट्रोल होतोय ‘हा’ भारतीय खेळाडू, घ्या जाणून

-हसीन जहानला येतेय ‘पिया की याद’; परंतु चाहते म्हणतात, शमी तर…

-पंड्याची पत्नी नताशाने शेअर केला फोटो; चाहते म्हणतात, भाभी…

ट्रेंडिंग लेख-

-आरसीबीने आयपीएलमध्ये केल्यात सर्वाधिकवेळा २०० पेक्षा अधिक धावा; पहा बाकी संघ आहेत कोणत्या क्रमांकावर

-एमएस धोनीमुळे भारतीय संघाला मिळाले हे ५ ‘मॅच विनर’….

-भारताचे ३ दिग्गज खेळाडू ज्यांना कधीच मिळाला नाही अपेक्षित सन्मान…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---