बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या ट्रॉफीमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाते. यातील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारताने तर संपूर्ण मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान पहिला कसोटी सामना नागपूरला खेळला जाणार आहे. या ट्रॉफीबाबतची मोठी माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी (13 जानेवारी) संघ जाहीर केला तेव्हा भविष्यात या मालिकेचे स्वरुप बदलणार असल्याचेही सांगितले.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला. ज्यामध्ये रवींद्र जडेजा याचे संघपुनरागमन होत असून ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांची पहिल्यांदाच थेट कसोटी संघात निवड झाली आहे. चार सामन्यांची ही कसोटी मालिका आयसीसी कसोटी अजिंक्यपद 2021-23चा भाग आहे. तर पुढे ही मालिका नव्य स्वरूपात दिसणार आहे. या मालिकेत चार नाहीतर पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.
हा चार कसोटी सामना खेळण्याचा बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा शेवटचा हंगाम असणार आहे, असे बीसीसीआयने म्हटले आहे. पुढे या मालिकेत चार नाहीतर पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत. 2003-04पासून या मालिकेत चार सामने खेळले जाऊ लागले, तर 2010-11मध्ये एकदाच दोन सामने खेळले गेले होते. या मालिकेत शेवटी पाच सामने 1991-92मध्ये खेळले गेले.
आयसीसीने 2022च्या ऑगस्ट महिन्यात पुरुषांचे 2023-27च्या मालिकांचे वेळापत्रक (एफटीपी) जाहीर केले होते. ज्यामध्ये दोन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे मिळून 10 सामने खेळले जातील असे नमूद केले होते. ज्यामधील पहिली ट्रॉफी 2023-25दरम्यान ऑस्ट्रेलियात खेळली जाणार असून त्यात पाच सामन खेळले जाणार आहेत. त्यानंतर भारत 2025-27च्या दरम्यान ही ट्रॉफी आयोजित करणार आहे.
कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ
पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकत व सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलियन संघ-
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ (उपकर्णधार), डेविड वॉर्नर, ऍश्टन एगर, स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी, कॅमरुन ग्रीन, जोश हेझलवूड, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, लान्स मॉरिस.
(BCCI & ICC Confirm End of traditional 4 match test series for Border Gavaskar Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडकर्त्यांनी मोठ्या खेळाडूला दिला डच्चू, पठ्ठ्या चांगलाच भडकला
त्रिशतक आले कामी! टीम इंडियात निवड होताच पृथ्वी शॉने शेअर केली इंस्टाग्राम स्टोरी