Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडकर्त्यांनी मोठ्या खेळाडूला दिला डच्चू, पठ्ठ्या चांगलाच भडकला

भारत- ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी निवडकर्त्यांनी मोठ्या खेळाडूला दिला डच्चू, पठ्ठ्या चांगलाच भडकला

January 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ind-vs-Aus

Photo Courtesy: Twitter/ICC


ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारताचा मोठा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळण्यासाठी ही मालिका खूपच महत्त्वाची मानली जात आहे. शुक्रवारी (दि. 13 जानेवारी) निवडकर्त्यांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये सूर्यकुमार यादव याला कसोटीत जागा दिली गेली, तर दुसरीकडे दुखापतग्रस्त रिषभ पंत याच्या जागी ईशान किशन आणि केएस भरत याला निवडले.

भारतासोबत दोन हात करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघही सज्ज आहे. त्यांनीही संघाची घोषणा केली, पण त्यात स्टार फिरकीपटू ऍडम झम्पा (Adam Zampa) याचा समावेश नाहीये. अशात त्याने निवडीबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. त्याने निवडकर्त्यांवर निशाणा साधत भारत दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्याने स्पष्टरीत्या अधिकाऱ्यांचे नाव घेत शेवटच्या क्षणी मन बदलण्याचा आरोप लावला आहे.

माध्यमांनी झम्पाच्या हवाल्याने सांगितले की, “मी खूपच जवळ होतो. मला जॉर्ज बेली आणि एँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी म्हटले होते की, या दौऱ्याबाबत निर्णय घेणे, त्यांच्यासाठी खूप कठीण राहिले. मी खूपच नाराज आहे. मला भारत दौऱ्यावर जाण्याची संधी मिळाली असती तर बरं झालं असतं. मी विचार करतो की, ज्याप्रकारची कामगिरी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करून दाखवली आहे, त्यानुसार मला संधी दिली गेली पाहिजे होती.”

“मला जो मेसेज देण्यात आला होता, त्यानुसार असे वाटत होते की, भारत दौऱ्यावर जाणाऱ्या संघात माझी निवड पक्की आहे. 6 आठवड्यांपूर्वी मला असा मेसेज देण्यात आला होता आणि आता मी संघात नाहीये. त्यामुळे मला खूप वाईट वाटत आहे. मी भारताचा दौरा करण्यासाठी खूपच उत्साहित होतो. मला पूर्ण विश्वास होता की, मला संघात जागा मिळेल. तसेच, माझी गोलंदाजी स्टाईल आहे, ती भारतात संघासाठी फायदेशीर ठरते. मात्र, शेवटच्या क्षणी कदाचित निवडीचा विचार बदलला गेला,” असेही पुढे बोलताना झम्पा म्हणाला.

भारत दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलिय संघाचा पुढील 2025चा दौरा भारतीय उपखंडातील श्रीलंकेत होईल. झम्पाने म्हटले आहे की, तो इतक्या पुढचा विचार करत नाहीये. तसेच, यावर्षी विश्वचषक आणि पुढील वर्षी टी20 विश्वचषकावर लक्ष देत आहे. तो सध्या वनडे क्रमवारीत पाचव्या आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत सातव्या स्थानी आहे. (ind vs aus test series this player fires on selectors over test selection read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास

आणखी एक क्रिकेटपटू बीसीसीआयची वाट पाहून कंटाळला! म्हणाला, ‘विदेशात खेळण्याची….’


Next Post
Diksha-Gondhali

महाराष्ट्राने गमावली नवोदित कबड्डीपटू! 17 वर्षीय दिक्षाचा अपघातात दुर्दैवी अंत

Athiya-Shetty-KL-Rahul

केएल राहुलच्या लग्नाला उपस्थित नसतील भारतीय खेळाडू, पण संघ मोठी भेट देण्याच्या तयारीत

Ind-vs-Aus

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे स्वरुप बदणार बीसीसीआयने केले स्पष्ट! कधी आणि कोणता बदल होणार घ्या जाणून

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143