सध्या भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे आणि तेवढ्याच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडच्या या भारत दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून दोन्ही मालिकांसाठी शुक्रवारी (13 जानेवारी) भारतीय संघ जाहीर झाला आहे. त्यातील टी20 मालिकेत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw)याला निवडण्यात आले आहे. त्याबाबत त्याची रिऍक्शन समोर आली आहे.
तब्बल 537 दिवसानंतर पृथ्वी भारतीय संघात परतला आहे. त्याने नुकतेच रणजी ट्रॉफीमध्ये विक्रमी 379 धावांची खेळी केली. ही खेळी त्याने मुंबईकडून खेळताना आसामविरुद्ध केली होती. ती रणजीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. आता त्याची भारताच्या टी20 संघात पुन्हा एकदा निवड झाली. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याने त्या अभिनंदनाच्या काही स्टोरी इंस्टाग्रामला देखील ठेवल्या आहेत. त्या आता व्हायरल होत आहेत.

Instagram/ Screengrab/ Prithvi Shaw
पृथ्वीने 2018मध्ये भारतीय संघात पदार्पण केले, त्यानंतर तो संघाकडून 2021मध्ये शेवटचा सामना खेळला. त्याने भारताकडून आतापर्यंत 5 कसोटी, 6 वनडे आणि एक टी20 सामना खेळला आहे. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधीच मिळाली नाही. यामुळे निराश न होता त्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी सुरूच ठेवली.
पृथ्वी 2022च्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या स्थानावर होता. त्यामध्ये त्याने एक शतक आणि अर्धशतकासह 363 धावा केल्या होत्या. त्याबरोबरच भारताच्या टी20 संघात कुलदीप यादव याचेही पुनरागमन झाले आहे. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी20 सामना ऑगस्ट 2022मध्ये खेळला होता. युझवेंद्र चहल यालाही निवडले असून पुन्हा एकदा टी20मध्ये कुल-चा जोडी पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ व मुकेश कुमार.
( After getting selected in Team India, Prithvi Shaw shared an Instagram story)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौकार षटकारांचा पाऊस पाडत 13 वर्षीय खेळाडूची वादळी खेळी, 500 धावा कुटत रचला इतिहास
INDvSL: शेवटच्या वनडेत भारताची ‘या’ वर्ल्डरेकॉर्डवर नजर, ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्याची संधी