---Advertisement---

राहुल द्रविडकडून जाणार एनसीए संचालकपद? बीसीसीआयने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

On: मंगळवार, ऑगस्ट 10, 2021 7:17 PM
---Advertisement---

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बेंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) संचालक पदासाठी अर्ज मागविण्याची सुरुवात केली आहे. सध्या एनसीएचे संचालकपद भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड हे सांभाळत आहेत. भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या दृष्टीने हे पद महत्त्वपूर्ण मानले जाते. युवा खेळाडू तसेच राष्ट्रीय संघातून बाहेर असलेल्या खेळाडूंवर एनसीएमध्ये मेहनत घेतली जाते.

बीसीसीआयने केली घोषणा
सध्या एनसीएचे संचालक असलेल्या राहुल द्रविड यांचा कालावधी लवकरच संपुष्टात येणार आहे. द्रविड हे जुलै २०१९ पासून या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात अनेक युवा क्रिकेटपटूंनी भारतासाठी पदार्पण देखील केले. मात्र, नियमानुसार या पदासाठी पुन्हा एकदा अर्ज मागवण्यात येतील. राहुल द्रविड हे पुन्हा एकदा एनसीए संचालक पदासाठी अर्ज करण्याची शक्‍यता आहे.

अशी ठरवली जाईल पात्रता
एनसीए संचालक पदासाठी बीसीसीआयने एक विशिष्ट पात्रता आखून दिली आहे. अर्ज करणारी व्यक्ती भारतासाठी कमीत कमी २५ कसोटी सामने खेळलेली असावी. सोबतच त्या व्यक्तीला कमीत कमी पाच वर्षाचा एखाद्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, आयपीएल, महिला अथवा एकोणीस वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षणाचा अनुभव हवा. अर्ज करण्याची अखेरची तारीख १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत आहे.

द्रविडकडेच राहू शकते जबाबदारी
राहुल द्रविड यांनी या पदासाठी पुन्हा अर्ज केल्यास ही जबाबदारी त्यांच्याकडेच राहू शकते. यासोबत, रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड यांच्याकडे पाहिले जात आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर त्यांनी उत्कृष्टरित्या संघाचे संचालन केले होते. टी२० विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असून, या विश्वचषकात भारत सर्वोत्तम कामगिरी करू न शकल्यास हे पद द्रविड यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“माझ्यासाठी खेळानंतरच स्टाईल”, ‘त्या’ निर्णयाबाबत नीरजचा महत्त्वपूर्ण खुलासा

ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी आयसीसी सकारात्मक, ‘या’ वर्षी होऊ होऊ शकते सुरुवात

विराटचे टेंशन वाढले; लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंड संघात सामील होणार ‘हा’ धाकड अष्टपैलू, प्रशिक्षकांचे संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---