भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) सध्या आयपीएल 2023 च्या आयोजनात व्यस्त आहे. बीसीसीआय याच वर्षाच्या अखेरीस क्रिकेटचा सर्वात मोठा महोत्सव म्हटल्या जाणाऱ्या वनडे विश्वचषकाचे आयोजन करेल. त्याच दृष्टीने आता बीसीसीआयने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, विश्वचषकातील सामने ज्या मैदानावर खेळले जाणार आहेत त्यापैकी पाच मैदानांच्या डागडुजीसाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिलीये.
यावेळी बीसीसीआय व भारत प्रथमच पूर्ण वनडे विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. भारतातील विविध 12 शहरांमध्ये हा विश्वचषक खेळला जाईल. या विश्वचषकातील 48 सामने अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, धर्मशाला, गुवाहाटी, लखनऊ, इंदूर आणि राजकोट या बारा शहरांमधील मैदानांवर होतील. विश्वचषकाचे आयोजन 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
बीसीसीआयची वार्षिक बैठक नुकतीच झाली. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले. विश्वचषकातील सामने ज्या मैदानावर होणार आहेत त्या मैदानावरील काही सोयी सुविधांसाठी बीसीसीआयने तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली. मागील काही काळापूर्वी दिल्ली व मुंबई येथील प्रेक्षकांनी या मैदानांवर पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहांची कमतरता असल्याचे म्हटलेले. त्यामुळेच बीसीसीआयने या दोन शहरांव्यतिरिक्त आणखी तीन मैदानांच्या रेनोवेशनवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, या तरतुदीनुसार ईडन गार्डन, कोलकाता येथे सर्वाधिक 127 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. त्यानंतर हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर 117.17 इतका खर्च केला जाईल. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर 100 कोटींचा खर्च केला जाणार आहे. याव्यतिरिक्त मोहाली येथील स्टेडियमसाठी 79.46 कोटी तर वानखेडे स्टेडियमसाठी 78.42 कोटी इतका खर्च केला जाईल.
(BCCI is set to upgrade stadiums in Hyderabad, Kolkata Mohali Mumbai Delhi ahead of the World Cup with a budget of 500 crores)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला