भारतीय क्रिकेट बोर्ड २०२३-२०२७ या पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्कांमधून तब्बल ५ अब्ज डॉलर्स अर्थात ३६००० करोड रुपये कमवू शकते. याशिवाय आयपीएलमध्ये दोन नवीन संघांच्या आगमनाने अनेक मोठी नावे बोली प्रक्रियेच्या शर्यतीत आहेत. २०१८ ते २०२२ या काळासाठी आयपीएलचे प्रसारण अधिकार स्टार इंडियाकडे आहेत. त्यावेळी त्याचे मूल्यमापन सुमारे २.५ अब्ज डॉलर्स होते. परंतु पुढील काळात ही रक्कम दुप्पट होण्याची शक्यता आहे.
बोर्डाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, अमेरिकेतील एका कंपनीने काही काळापूर्वी आयपीएल मीडिया अधिकारांसाठी बोली लावण्यात स्वारस्य व्यक्त केले होते. २०२२ पासून आयपीएलमध्ये दहा संघ असतील आणि ७४ सामने होतील.
ते म्हणाले, ‘दोन नवीन संघांच्या आगमनाने ७००० ते १०००० कोटी रुपये येतील आणि प्रसारणाचे अधिकारही वाढतील.’ पुढील काळात, आयपीएलचे प्रसारण अधिकार चार ते पाच अब्ज डॉलर्सच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. भारतीय चलनात याची किंमत तब्बल ३० ते ३६ हजार करोड रुपये इतकी असेल.
कोणत्याही परदेशी कंपनीची भारतात शाखा असल्यावरच आयपीएल मीडिया प्रसारणाचे अधिकार मिळतील. गेल्या वेळी टीव्ही आणि डिजिटल मीडियाचे अधिकार स्टार इंडियाने सोनी ग्रुपला पराभूत करून मिळवले होते. बीसीसीआय साधारणपणे टीव्ही, डिजिटल (स्ट्रीमिंग), रेडिओ आणि सोशल मीडिया अधिकारांचे वर्गीकरण करून ते विकत असे. परंतु, गेल्या वेळी सर्व अधिकार फक्त एकाला देण्यात आले होते.
कंपन्या स्वतंत्रपणे बोली लावू शकतात. परंतु, जर कोणत्याही एका बोलीचे मूल्यांकन इतर सर्व बोलींच्या रकमेपेक्षा जास्त असेल तरच त्यांना अधिकार दिले जातील. बीसीसीआय २५ ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये निविदा जाहीर करेल. आयपीएलच्या दोन नवीन संघांची घोषणाही त्याच दिवशी केली जाईल. मँचेस्टर युनायटेडचे मालक असलेल्या ग्लेसर कुटुंबाने आयपीएल संघाच्या लिलावाचे कागदपत्रही घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-पाक सामन्यानंतर आयपीएलच्या दोन नव्या संघांवर होणार शिक्कामोर्तब? वाचा सविस्तर
विराटमुळे रोहितची झाली फजिती? सोशल मीडियावर ‘हिटमॅन’ होतोय ट्रोल
गोल्डन बॉय इज बॅक! नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर परतला मैदानावर, पाहा फोटो






