मुंबई । कोरोना व्हायरसमुळे जे लाॅकडाऊन सुरु होते, त्यात आता सरकार शिथीलता आणत आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रात थोडेफार आनंदाचे वातावरण आहे.
यातच आता बीसीसीआयने (BCCI) आपल्या खेळाडूंचा ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये कॅंपच्या दृष्टीने विचार करण्यास सुरुवात केली आहे. ते याच नियोजनासह पुढे सराव करणार आहेत.
भारतातील मान्सूनचा हंगाम संपल्यानंतर सर्व खेळाडूंना एकत्र आणून त्यांचा एकत्र सराव घेण्याचा बीसीसीआय विचार करत असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
लाॅकडाऊनच्या (Lockdown) काळात अनेक खेळाडूंनी आपला बहुतांश वेळ घरातच व्यतीत केला आहे. त्यामुळे अशा खेळाडूंना पुन्हा क्रिकेटमध्ये परतण्यासाठी वेळ लागणार आहे.
खेळाडू सर्व फीट आहेत. परंतु शारिरीक तंदुरुस्तीबरोबर मानसिक तंदुरुस्तीही तेवढीच महत्त्वाची आहे. कारण सर्व खेळाडू जे काही करत होते, ते सर्व घरी करत होते.
एक महिन्यानंतर देशात नक्की काय स्थिती आहे याचा विचार करुन कॅंप कुठे सुरु करता येईल, याचा बीसीसीआय विचार करत आहे. त्यामुळे बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्येच (National Cricket Academt) कॅंप होईल, याची सध्यातरी कोणतीही खात्री नाही.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंड संघाला मिळणार नवा कसोटी कर्णधार, बेन स्टोक्स होणार पहिल्याच कसोटीत…
-संपुर्ण वेळापत्रक: लाॅकडाऊननंतर सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी मालिकेचे संपुर्ण वेळापत्रक