---Advertisement---

वनडे विश्वचषकामुळे बीसीसीआय होणार कंगाल? भारत सरकारची नीती ठरणार मारक

On: शुक्रवार, ऑक्टोबर 14, 2022 1:52 PM
---Advertisement---

पुढील वर्षी भारतात वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. भारत प्रथमच स्वतंत्ररीत्या वनडे विश्वचषकाचे आयोजन करेल. या विश्वचषक आयोजनातून मोठा नफा मिळवण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) योजना असेल. मात्र, या योजनेला आता खो बसण्याची शक्यता आहे. भारत सरकारच्या निर्बंधामुळे बीसीसीआयलाच आता शेकडो कोटींचा फटका बसू शकतो.

भारत पुढील वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे विश्वचषकाचे आयोजन करेल. या आयोजनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) ही क्रिकेटचे जागतिक संचालन करणारी संस्था मदत करत असते. मात्र, भारत सरकार त्यांना कोणत्याच प्रकारे या स्पर्धेच्या आयोजनासाठी टॅक्समध्ये सवलत देत नाही. बीसीसीआय टॅक्समध्ये सवलत मिळण्यासाठी भारत सरकारकडे प्रयत्न करेल.

बीसीसीआयने नुकतेच आपल्या सर्व राज्य क्रिकेट संघटनांना एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये उल्लेख केला गेला आहे की, ‘2023 विश्वचषकासाठी आयसीसीला जी रक्कम सवलत म्हणून देण्यात येणार आहे, त्या सर्व रकमेची पूर्तता बीसीसीआयच करेल.’

या सर्व प्रकरणामुळे बीसीसीआयला 450 ते 900 कोटींपर्यंतचा तोटा सहन करावा लागू शकतो. 2016 टी20 विश्वचषकानंतर भारतात प्रथमच आयसीसी ची कोणतीही मोठी स्पर्धा होत आहे. 2016 टी20 विश्वचषकावेळी देखील याच मुद्द्यावरून झाला होता. त्यावेळी सवलतीची रक्कम म्हणून आयसीसीने बीसीसीआयच्या निधीत तब्बल 230 कोटींपेक्षा जास्त रकमेची कपात केलेली. तसेच भारत सरकारने त्या विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर देखील कर लादला होता.

बीसीसीआयने आयसीसीसोबत 2014 मध्ये कर सवलतीचा करार केला होता. त्यावेळी भारतात तीन आयसीसी स्पर्धा होणार असल्याचे निश्चित झालेले. परंतु त्यानंतर भारत सरकारने आपल्या कर धोरणात बदल केल्याने बीसीसीआयला तोटा सहन करावा लागला. त्या करारावेळी 2016 टी20 विश्वचषक, 2018 चॅम्पियन्स ट्रॉफी (ज्याचे नंतर 2021 टी20 विश्वचषकात रूपांतर करण्यात आले) व 2023 वनडे विश्वचषक या स्पर्धा भारतात होणार असल्याचे निश्चित झालेले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भविष्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेत आमनेसामने येतील का? घ्या जाणून
टी२० विश्वचषकातील पाच ‘सिक्सर किंग्स’; युवी दुसऱ्या स्थानी तर ‘हा’ दिग्गज अव्वल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---