---Advertisement---

मोठी बातमी! मोदींचं ऐकून बीसीसीआयने घेतला होता ‘हा’ निर्णय, ट्विटरने थेट ब्ल्यू टीकच हटवली

On: रविवार, ऑगस्ट 13, 2023 6:12 PM
Narendra Modi Jay Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आपल्या एक्स खात्याची ब्लू टीक गमावली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ‘हर घर तिरंगा अभियान’ मोठ्या प्रमाणात आमलात आणण्याचे आवाहान केले होते. बीसीसीआयने याच पार्श्वभूमीवर ट्वीटर खात्यावर आफला डीपी बदलून तिरंगा ठेवला. पण एक्सकडून बीसीसीआयची ब्लू टीक काढून घेतली गेली आहे.

इलॉन मस्क (Elon Musk) याने अलिकडच्याच काळात ट्वीटरचे (Twitter) नाव बदलून एक्स (X) केले. सोबतच जगप्रसिद्ध ट्वीटरला लोग देखील बदलला आणि एक्स ठेवला. मस्ककडे ट्वीटरची (नवीन नाव एक्स) मालकी आल्यापासून त्याने या ऍपमध्ये अनेकदा फेरबदल केले आहेत. यावर्षी भारत 15 ऑगस्ट रोजी 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘हर घर तिरिंगा’ (har ghar tiranga) अभियान मोठ्या प्रमाणात रावण्यासाठी आवाहन केले.

https://twitter.com/thecricketgully/status/1690672182769455104?s=20

पंतप्रधानांच्या आवाहनाला दात देत बीसीसीआयने आफल्या एक्स खात्याच्या डीपीला तिरंगा ठेवला. पण हा निर्णय बीसीसीआयला काही अंशी महागात पडल्याचे दिसते. कारण एक्सने बीसीसीआयच्या खात्याची ब्लू टीक (Blue Tick) काढून टाकली आहे. यामुळे चाहत्यांना अधिकृत खात्याची ओळख पटण्यासाठी अडचणी येऊ शकतात. तरी आता एक्स याविषयी पुढे का निर्णय घेणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजविरुद्धची टी-20 मालिका 2-2 अशा बरोबरीवर आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना रविवारी (13 ऑगस्ट) खेळला जाणार आहे. (BCCI Loses Blue Tick Due to PM Narendra Modi’s DP Change Request.)

महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकापूर्वी रोहित सहकुटुंब बालाजी चरणी, कर्णधाराला पाहण्यासाठी चाहत्यांची तुंबळ गर्दी
पोलिस कर्मचाऱ्याने फलंदाजाचा उडवला बोल्ड, व्हिडीओ पाहून उंचावतील तुमच्या भुवया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---