Head Coach Gautam Gambhir : गौतम गंभीर (Gautam Gambhir), हा त्याच्या स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. आता त्याच्या याच स्वभावामुळे बीसीसीआयची पहिलीच (BCCI Meeting) बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे समजत आहे. यानंतर गंभीरने या बैठकीत नेमके असे काय केले, ज्यामुळे बीसीसीआयने बैठक पुढे ढकलली? हा प्रश्न सर्वांना पडलाय.
टी20 विश्वचषकासह प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला आणि बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या खांद्यावर प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवली. आता येत्या 27 जुलैपासून श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेद्वारे गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून पदार्पण करणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने प्रशिक्षक गंभीरची ओळख भारताचे निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि अन्य समितीमधील सदस्यांबरोबर व्हावी, यासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या सर्वांना भविष्यात एकत्र काम करायचे आहे. त्यासाठी या सर्वांची ओळख व्हावी आणि भविष्यात चांगलेच काम व्हावे, यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
पण फक्त एकमेकांची ओळख व्हावी, या हेतून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत गंभीरने वेगळेच काही केले. त्याने या बैठकीमध्ये भारतीय संघाच्या भविष्याबाबत चर्चा सुरु केली. त्यानंतर त्याने यावेळी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड कशी असायला हवी?, या संघात कोणत्या खेळाडूंना संधी द्यायला हवी?, यावर आपली मते मांडली.
India’s selection meeting for the Sri Lanka tour has been postponed. (Abhishek Tripathi). pic.twitter.com/aSqrjy7hSp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 17, 2024
गंभीरने या बैठकीत ज्या विषयांवर चर्चा केली, त्यासाठी या बैठकीचे प्रयोजन नक्कीच करण्यात आले नव्हते. त्यामुळे ही बैठक अखेर पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान बीसीसीआय 19 ते 22 जुलै दरम्यान दुसऱ्या बैठकीचे आयोजन करू शकते. या बैठकीत भारताचा टी20 कर्णधार कोण असेल?, हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाईल. तसेच वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा या सिनीयर खेळाडूंना विश्रांती द्यायची की खेळवायचे? हा निर्णयदेखील घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर फक्त ट्रेलर, पाहा पुढे आणखी काय काय होणार.., गौतम गंभीरने 2023 मध्येच दिलेला इशारा
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?