भारताता सध्या कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विशेषतः ओमिक्रॉन विषाणूमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ पाहता, पुढच्या महिन्यापर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी माहिन्यात वेस्ट इंडीज संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. अशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा परिणाम या आगामी मालिकेवर पडण्याची शक्यता आहे. परंतु, बीसीसीआय मालिका खेळवण्याविषयी ठाम असल्याचे समजते.
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात फेब्रुवारी महिन्यात तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळली जाणार आहे. वेस्ट इंडीजसोबतच्या आगामी मालिकेतील सर्व सामने वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. अशात बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतातील कोरोनाची लाट शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे अशात बीसीसीआय आगामी मालिकेविषयी काय निर्णय घेते हे पाहण्यासारखे असेल. बीसीसीआयच्या विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड मालिकेच्या नियोजनात काही महत्वाचे बदल करू शकते.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आगामी मालिकेविषयी गोष्टी आतापासूनच कठीण वाटू लागल्या आहेत. फेब्रुवारीत कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचली, तरी आम्ही तयार राहू. सहा सामन्यांना सहा वेगवेगळ्या टिकाणी खेळणे कठीण जाऊ शकते. अशात मालिका एक किंवा दोन स्टेडियमवर खेळवण्याचा विचार केला जात आहे.’
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील आगामी मालिकेचे वेळापत्रक –
वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी२० मालिका भारतीय संघ मायदेशात खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला अहमदाबादला खेळला जाईल. दुसरा एकदिवसीय सामना ९ फेब्रुवारीला जयपूरमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना १२ फेब्रुवारीला कोलकातामध्ये खेळला जाईल. एकदिवसीय मालिका संपल्यानंतर १५ फेब्रुवारीपासून उभय संघातील टी२० मालिकेची सुरुवात होईल. टी२० मालिकेतील पहिला सामना १५ फेब्रुवारीलाल कटकमध्ये, दुसरा सामना १८ फेब्रुवारीला विशाखापट्टनममध्ये आणि शेवटचा तिसरा सामना २० फेब्रुवारीला तिरुवनंतपुरममध्ये खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
स्टोक्स, बटलरसहित इंग्लंडचा शतकवीरही जखमी, इंग्लंड बोर्डाने ‘या’ नव्या खेळाडूला केले सहभागी
राहुल द्रविड घेणार रिषभ पंतची शिकवणी? वाचा काय म्हणाले मुख्य प्रशिक्षक
मँचेस्टर युनायटेडमध्ये खळबळ! एकाच वेळी तब्बल १७ प्रमुख खेळाडू संघ सोडण्याच्या तयारीत
व्हिडिओ पाहा –