भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथा सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. मात्र या सामन्या अगोदरच वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत होते व त्यानुसार चौथा सामन्यावर टांगती तलवार होती. भारतीय संघ सिडनी येथेच चौथा कसोटी सामना खेळावा असे मत मांडत असल्याचे एका रिपोर्टनुसार पुढे आले होते. मात्र आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष निक हॉकले यांनी हे सर्व रिपोर्ट चुकीचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
निक हॉकले म्हणाले, “आम्ही बीसीसीआयच्या अधिकार्यांशी प्रत्येक दिवशी संभाषण करत आहोत. बीसीसीआयचा प्रत्येक वेळी सकारात्मक प्रतिसाद असून ,आम्हाला त्यांच्याकडून कुठलीही अडचण आलेली नाही. आम्ही जो कार्यक्रम आखला आहे त्यानुसारच दोन्ही संघ खेळण्यास तयार आहेत “.
मागील काही दिवसांत बातमी समोर येत होती की ,भारतीय संघ ब्रिस्बेन येथे पुन्हा विलगीकरणात जाण्याच्या मानसिकतेत नसून, तिसरा व चौथा कसोटी सामना सिडनी येथे खेळण्यास तयार आहे. मात्र आता निक हॉकले यांच्या स्पष्टीकरणामुळे चौथ्या कसोटी सामन्यावरील टांगती तलवार नाहीशी झाली आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ 1 -1 ने बरोबरीत असून, तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राउंड वर सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
धक्कादायक! आयपीएलच्या सामन्यावर सट्टा लावू इच्छित होती एक व्यक्ती, भारतीय खेळाडूशी साधला होता संपर्क
वाढदिवस विशेष : परदेशात भारतीय संघाला पहिली कसोटी मालिका जिंकून देणारा कर्णधार