उर्वरित इंडियन प्रीमियर लीग २०२१ (आयपीएल) हंगामातील उर्वरित सामन्यांचे नियोजन १९ सप्टेंबर पासून यूएईमध्ये होणार आहे. अशात क्रिकेटप्रेमींसाठी एक दुःखद घटना समोर आली आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानला काबीज केले आहे. त्यामुळे आता उर्वरित आयपीएल २०२१ मध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतात. सध्या दोन्ही खेळाडू सध्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या १०० चेंडूच्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. राशिद ट्रेंट रॉकेट्स या संघाकडून खेळतो, तर नबी लंडन स्पिरिट्स या संघाकडून खेळतो. तसेच एका सूत्रानुसार भारतीय नियामक मंडळने (बीसीसीआय) या दोघांनीही उर्वरित आयपीएल खेळावी अशी इच्छा व्यक्त केली असल्याचे समजते.
पीटीआय सोबत बोलताना बीसीसीआयच्या एक सूत्राने सांगितले, “यावर आत्ताच काहीही बोलू शकत नाही. मात्र, आम्ही या सगळ्यावर नजर ठेवून आहोत. आमच्यासाठी अजूनही काही बदललेलं नाही. आम्ही आशा करतो की राशिद खान आणि इतर अफगाणिस्तानचे खेळाडू उर्वरित आयपीएलमध्ये सहभाग नोंदवतील.”
दरम्यान, २१ ऑगस्टला ‘द हंड्रेड’ स्पर्धा संपणार आहे. यानंतर नबी आणि राशिद खान आपल्या मायदेशात परतणार आहेत की, यूएईला रवाना होणार आहेत. हे अजून स्पष्ट झालेले नाही. जर नबी आणि राशिद स्पर्धेनंतर इंग्लंडलाच थांबले. तर, बीसीसीआय या दोघांची यूएईला जाण्याची व्यवस्था करू शकतात. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.
या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ उर्वरित आयपीएलसाठी यूएईला रवाना होणार आहे. त्यासोबत या दोन्ही अफगाणी खेळाडूंनाही रवाना करण्यात येऊ शकते. नबी आणि राशिद खान समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. या आधीच त्यांनी जगभरातील ताकदवर नेत्यांना अफगाणिस्तानची मदत करण्यासाठीचे आवाहन केले होते.
अल जजिरा न्यूज नेटवर्क वर एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. ज्यात तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलला आपल्या ताब्यात घेतले आहे. यानंतर राष्ट्रपती भवनमधून तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानला ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
यामुळेच अफगाणिस्तानचे खेळाडू उर्वरित आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होतील, की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान यूएईमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल २०२१ चा पहिला सामना. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. तसेच हे दोन्ही संघ याआधीच यूएईला रवाना झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–वेस्टइंडिजच्या ११ व्या क्रमांकाच्या खेळाडूची कमाल, पाकिस्तानविरुद्ध अवघे १३ चेंडू खेळत मिळवून दिला विजय
–कर्णधारानेच टिपला कर्णधाराचा झेल; कोहलीचा आनंद गगनात मावेना, पाहा व्हिडिओ
–शमी-बुमराहची फलंदाजी पाहून सेहवागला आठवली ‘त्या’ दोन दिग्गजांची झुंजार खेळी