भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला शुक्रवारी (20 नोव्हेंबर) पितृशोक झाला. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. वडिलांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या वेगवान गोलंदाजाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला आहे. या दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो भारतीय संघासोबत सध्या ऑस्ट्रेलियात आहे. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली.
सिराजने भारतीय संघासोबतच राहण्याचा घेतला निर्णय
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शनिवारी एक पत्रक प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की बीसीसीआयने मोहम्मद सिराजशी चर्चा केली आहे. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला, पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने मोहम्मद सिराजने घेतलेल्या या निर्णयाचा आदर केला आणि या कठीण काळात सिराजचे सांत्वन केले आहे.
Team India fast bowler Mohammed Siraj lost his father. Siraj has decided to stay with the Indian contingent.
The BCCI shares his grief and will be supportive of Siraj in this extremely challenging phase.
Statement: https://t.co/bi8CkrZ2Lc pic.twitter.com/u22O4XtpcA
— BCCI (@BCCI) November 21, 2020
मुलाला देशाकडून क्रिकेट खेळताना पाहण्याचे होते वडिलांचे स्वप्न
सिराजने आपल्या वडिलांच्या स्वप्नाखातर ऑस्ट्रेलियामध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांच्या निधनानंतर तो शुक्रवारी म्हणाला होता की, “माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी देशाचे नाव उज्ज्वल करावे आणि मी ते नक्कीच करेन. माझ्या पाठीशी नेहमी उभा असलेला एक भक्कम आधार मी आज गमावला. हा एक अतिशय दुःखदायक क्षण आहे. मला देशाकडून खेळताना पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते.”
गरिबीची परिस्थिती असूनही वडिलांनी मुलाला केलं सहकार्य
सिराजचे वडील ऑटोरिक्षा चालक होते. परंतु, असे असूनही त्यांनी आपल्या मुलाला क्रिकेटपटू बनविण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं आणि त्याला कशाचीही कमतरता भासू दिली नाही.आता मोहम्मद सिराज भारतीय संघाचा सदस्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३ दिग्गज कर्णधार, ज्यांच आयपीएल कर्णधारपद मात्र धोक्यात
ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७६ सामने खेळलेल्या खेळाडूला मिळाली लंका प्रीमियर लीगमध्ये संधी
“चेन्नई सुपर किंग्जने सर्व खेळाडूंना संघातून मुक्त करावे”, दिग्गजाचे खळबळजनक विधान





