गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटमध्ये अनेक महत्वाचे बदल पाहायला मिळाले आहेत. जेव्हापासून सौरव गांगुली यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचे) अध्यक्षपद स्विकारले आहे. तेव्हापासून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. नुकताच बीसीसीआयची एक बैठक झाली आहे, या बैठकीत सौरव गांगुली आणि जय शाह यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने दिव्यांग क्रिकेटपटूंसाठी वेगळी सक्षम समिती स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जस्टीस लोढा यांच्या समितीच्या शिफारशीच्या आधारे तीन माजी दिव्यांग क्रिकेटपटूंची समिती बनवण्याची वाट पाहिली जात होती . दरम्यान ४ डिसेंबर रोजी कोलकाता येथे झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीत वेगळी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे महासचिव हारून रशीद यांनी म्हटले की, “आम्ही गेल्या काही वर्षांपासून याबाबत बीसीसीआयला सतत पत्र लिहून, दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश कांचन यांचे नाव समितीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सांगत होतो.”
तसेच आता दिव्यांग समितीची स्थापना होणार असल्याने पुन्हा एकदा मुकेश कांचन यांचे नाव समितीत समाविष्ट करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मुकेश कांचनसह अंध क्रिकेट संघटनेचे खेळाडू आणि भारतीय अपंग क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मानवेंद्र सिंग पटवाल, कर्णबधिर संघाचे सर्वात यशस्वी कर्णधार विवेक मालशे यांचे देखील नाव समितीत समाविष्ट करण्यासाठी पाठवण्यात आले आहे.
मुकेश कांचन यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी, आतापर्यंत एकूण ५७ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये २१ सामन्यात त्याने भारतीय अपंग संघाचे नेतृत्व केले आहे. ज्यावेळी भारतीय संघाने २०१५ मध्ये आशिया चषक स्पर्धेत जेतेपद मिळवला होता, त्यावेळी देखील मुकेश कांचन यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
महत्वाच्या बातम्या –
आर अश्विनची बातच न्यारी!! ‘असा’ कारनामा करत कुंबळे-मुरलीधरनसारख्या दिग्गजांच्या यादीत मिळवले स्थान
श्रेयस अय्यरला बर्थडे गिफ्ट!! सामना झाल्यानंतर विराट कोहलीने ‘बड्डेबॉय’चा दिवस केला अविस्मरणीय
शतकांचा दुष्काळ कधी संपणार ? विराटने दिले ‘हे’ उत्तर