प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा, ऍशेस मालिका (Ashes Series) याची येत्या ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऍशेसमधील पहिला सामना ब्रिसबेन येथे खेळला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी २ दिवसांआधीच आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली होती. यानंतर आता इंग्लंडनेही त्यांचा १२ सदस्यीय संघ (England 12 Man Squad) जाहीर केला आहे.
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अंडरसन याला पहिल्या कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी ख्रिस वोक्स याला कसोटी संघात सहभागी करण्यात आले आहे. तसेच धाकड अष्टपैलू बेन स्टोक्स हादेखील या सामन्याद्वारे मैदानावर पुनरागमन करणार आहे. मानसिक स्वास्थामुळे तो गेल्या बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर होता.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी, ECB) जाहीर केलेल्या १२ सदस्यीय खेळाडूंच्या यादीत वेगवान गोलंदाज म्हणून ख्रिस वोक्सव्यतिरिक्त स्टुअर्ट ब्रॉड, ऑलि रॉबिन्सन आणि मार्क वुड यांनाही जागा देण्यात आली आहे. त्यामुळे या ४ वेगवान गोलंदाजांपैकी एकाला ब्रिसबेन कसोटीत संघाबाहेर बसावे लागू शकते. फिरकी विभागात, जॅक लिच याला एकट्यालाच जागा दिली आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणे निश्चित आहे.
इंग्लंडच्या फलंदाजी विभागात जॉनी बेयरस्टोला जागा मिळालेली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला संघातून नारळ देण्यात आला आहे. त्याच्याजागी ऑली पोप प्लेइंग इलेव्हनचा भाग असेल. तसेच इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूट याच्यावर सर्वांच्या नजरा असतील. रूट सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये असून तो २०२१ वर्षातील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज राहिला आहे.
We have named a 12-player squad for the first Ashes Test at The Gabba ????#Ashes
— England Cricket (@englandcricket) December 7, 2021
असे असले तरीही, इंग्लंडच्या संघाला १९८६ पासून ब्रिसबेनच्या मैदानावर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आता इंग्लंडचा संंघ ही पराभवाची मालिका खंडित करेल की पुन्हा त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागेल, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.
इंग्लंडचा १२ सदस्यीय संघ: जो रूट (कर्णधार), स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), हसीब हमीद, जॅक लीच, डेविड मलान, ऑली पोप, ऑली रॉबिन, बेन स्टॉक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन: डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टिव्ह स्मिथन, ट्रेविस हेड, कॅमरॉन ग्रीन, एलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन आणि जोश हेजलवुड.
महत्त्वाच्या बातम्या-
सौरव गांगुली-जय शाह जोडीने घेतला मोठा निर्णय, ‘या’ क्रिकेटपटूंना होणार फायदा
द्रविडने ‘या’ कारणामुळे दिला होता प्रशिक्षक बनण्यास नकार, पण गांगुली-शहाने काढला तोडगा
‘भिडेगा तो बढेगा’, प्रो कबड्डी लीगच्या प्रोमोचा सोशल मीडियावर धुमाकूळ, धोनीच्या अंदाजाची भरपूर चर्चा