भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (6 जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व पार्दिक पंड्या (Hardik Pandya) करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठांना विश्रांती दिली गेली आहे. यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा यांना पहिल्यांदाच भारतीय संघाकडून बोलावणे आले आहे. सर्वांना अपेक्षा असताना रिंकू सिंग याला मात्र भारतीय संघात संधी मिळू शकली नाही. मात्र, भारतीय संघात त्याला लवकरच संधी मिळणार असल्याचे बीसीसीआय सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
रिंकूला संधी न मिळाल्याने चाहते तसेच माजी क्रिकेटपटूंनी निराशा व्यक्त केली होती. मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांने म्हटले,
“वेस्ट इंडीज दौऱ्यावर संधी न मिळाल्याने रिंकूने निराश होण्याचे कारण नाही. कारण, आम्ही एक योजना घेऊन चालत आहोत. या दौऱ्यानंतर होत असलेल्या आयर्लंड दौऱ्यावर त्याला नक्की जागा मिळेल. आगामी आशियाई स्पर्धांमध्ये भारताचा संघ पाठवला जाईल. त्यादृष्टीने अधिकाधिक युवा खेळाडूंची चाचपणी केली जातेय. ऋतुराज गायकवाड तसेच आयपीएल गाजवलेले अन्य खेळाडू देखील भारतीय संघाचा भाग होऊ शकतील.”
कोलकाता नाईट रायडर्ससाठी यावर्षी हंगामात रिंकूने सर्वोत्तम कामगिरी केली होती. 14 सामन्यात त्याने 59 पेक्षा जास्त सरासरीने 474 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट देखील 149 असा जबरदस्त राहिला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तब्बल 29 षटकार आले होते. गुजरातविरुद्ध अखेरच्या सामन्यात सलग 5 षटकार मारत त्याने संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
(BCCI Officials Said Rinku Singh Will Be Part Of India Team For Ireland Tour)
महत्वाच्या बातम्या-
बाप तैसा बेटा! डी लीडने एकहाती नेदरलँड्सला पोहोचवले वर्ल्डकपमध्ये, वडिलांनीही खेळले तीन विश्वचषक
माजी सलामीवीराचे धक्कादायक विधान! पहिल्यांदाच भारतीय संघात निवडलेल्या तिलकबद्दल म्हणाला, ‘चुकीचा निर्णय…’