या वर्षीच्या (2025) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 1-3 ने लज्जास्पद पराभव आणि मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममधील गोपनीय संवाद लीक झाल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. संघातील शांतता भंग केल्याच्या तक्रारीनंतर बोर्डाने तात्काळ कारवाई करत तीन प्रशिक्षकांना पदावरून हटवले आहे.
सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, ज्यांचा कार्यकाळ फक्त 8 महिन्यांचा होता, यांना हटवण्यात आलं आहे. त्याचबरोबर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांनाही घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
मीडिया रिपोट्सनुसार, ड्रेसिंग रूममधून बाहेर पडणाऱ्या बातम्यांमुळे संघातील वातावरण बिघडत असल्याची तक्रार एका वरिष्ठ सदस्याने केली होती. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने अलीकडेच घेतलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नायरच्या जागी सध्या तरी कोणत्याही नव्या प्रशिक्षकाची नेमणूक केली जाणार नाही, कारण सीतांशु कोटक आधीच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. दिलीपची जबाबदारी रायन टेन डोशेटकडे सोपवण्यात आली आहे.
???? CHANGES IN INDIAN COACHING STAFF ???? [Abhishek Tripathi]
— Johns. (@CricCrazyJohns) April 17, 2025
– One of the reason behind is the poor performance in BGT
– Assistant Coach Abhishek Nayar is likely to be removed.
– Fielding Coach T Dilip & Trainer Soham has been relieved from the duties as they completed more than 3… pic.twitter.com/q6kpSNlOqS
ट्रेनर सोहम देसाई यांची जागा आता एड्रियन ली रु घेतील. आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसोबत काम करणाऱ्या एड्रियन यांचा बीसीसीआयसोबत आधीच करार झालेला आहे. त्यांनी याआधी 2002-03 मध्ये भारतीय संघासोबत, तसेच 2008-19 दरम्यान कोलकाता नाईट रायडर्ससोबतही काम केले आहे. दरम्यान आता टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनात झालेले हे बदल आगामी स्पर्धांसाठी निर्णायक ठरू शकतात, हे मात्र नक्की.






