भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या २०१९ मध्ये झालेला ऐतिहासिक डे – नाईट कसोटी सामना अजूनही सर्वांना लक्षात असेल. आता लवकरच पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट चाहत्यांना भारतात डे नाईट कसोटी सामना अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे (india vs west indies) आणि कसोटी सामन्याची मालिका झाल्यानंतर भारतीय संघाचा सामना श्रीलंका संघासोबत होणार आहे. या मालिकेला कसोटी सामन्यांच्या मालिकेने प्रारंभ होणार होता. परंतु बीसीसीआय ही मालिका ३ टी२० सामन्यांच्या मालिकेने सुरू करण्याच्या विचारात आहे. कारण खेळाडूंना बबल टु बबल ट्रान्सफर होण्यासाठी सोपे जाऊ शकते.
श्रीलंका संघाविरुद्ध होणारा पहिला कसोटी सामना हा विराट कोहलीच्या कसोटी (Virat Kohli) कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. हा सामना बेंगलोरमध्ये होणार की नाही, याबाबत बोर्डने कुठलही स्पष्टीकरण दिलं नाहीये. बोर्ड प्रवास टाळण्यासाठी मालिका मोहाली आणि धर्मशाळामध्ये खेळवण्याचा विचारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी मालिकेचे आयोजन बेंगलोर आणि मोहालीमध्ये केले जाऊ शकते. तर टी२० मालिका मोहाली, धर्मशाळा आणि लखनऊमध्ये खेळवली जाऊ शकते.
एका प्रमुख वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, असे होऊ शकते की, टी२० मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने धर्मशाळामध्ये आयोजित केले जाऊ शकतात. तर अंतिम टी२० सामना मोहालीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. तर पहिला कसोटी सामना देखील याच मैदानावर खेळवला जाऊ शकतो. हा सामना डे नाईट क्रिकेट सामना खेळवला जाऊ शकतो, कारण या मैदानावर दव जास्त असतो. परंतु बीसीसीआय कोरोनाची स्थिती पाहून याबाबत निर्णय घेऊ शकते.
मात्र, जर श्रीलंका विरुद्ध होणारा पहिला कसोटी सामना बेंगलोरच्या मैदानावर पार पडला तर, ही भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी असणार आहे. कारण, बेंगलोरमध्ये विराट कोहलीचे असंख्य चाहते आहेत. त्याने २०१३ पासून आयपीएल स्पर्धेत या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
U19 क्रिकेट विश्वचषक: अफगाणिस्तानचे स्वप्न भंगले; २४ वर्षांनंतर इंग्लंड अंतिम फेरीत
मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ दहा मार्की खेळाडूंसाठी दिसणार ऍक्शन!
सुपर से भी ऊपर! दक्षिण आफ्रिकी खेळाडूने हवेत टिपला भारी झेल; आयसीसीही म्हणे, ‘सर्वोत्तम झेल’