---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी भारताची जय्यत तयारी, इंग्लंडनंतर ‘या’ संघांविरुद्ध खेळणार टी२० मालिका 

On: गुरूवार, मार्च 18, 2021 12:50 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सध्या पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेद्वारे उभय संघ टी२० विश्वचषक २०२१ ची तयारी करत आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कंबर कसली आहे. या टी२० विश्वचषकापुर्वी भारतीय संघ इतर दोन देशांविरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे.

साल २००७ मध्ये माजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने अखेरचा टी२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर त्यांना आजवर एकदाही विश्वचषक उंचावता आला नाही. अशात घरच्या मैदानावर होणारा आगामी टी२० विश्वचषक पटाकवण्यासाठी बीसीसीआय आपले सर्वोत्कृष्ट देण्याच्या प्रयत्नात आहे. त्याच अनुशंगाने बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे.

टाइम्स ऑफ इंडियातील वृत्तानुसार, ऑक्टोबर महिन्यात भारत दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या संघांविरुद्ध द्विपक्षीय टी२० मालिका खेळू शकते. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंबंधी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “टी२० विश्वचषक २०२१ पुर्वी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येऊ शकतात. या दौऱ्यात दोन्ही संघांविरुद्ध टी२० मालिका खेळवली जाईल. बीसीसीआय यासंदर्भात दोन्ही देशांच्या बोर्डाशी चर्चा करत आहे.”

दोन्ही संघांनी भारताला घरच्या मैदानावर केलंय पराभूत
टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्त्वपुर्ण ठरणार आहेत. कारण दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी भारताला मायभूमीत पराभूत केले आहे. याबरोबरच या दोन्ही देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होतात. त्यामुळे त्यांना भारतातील मैदाने थोडीफार ओळखीची आहेत. अशात भारतीय संघाला या प्रतिस्पर्धी संघांकडून काट्याची टक्कर मिळेल. असे असले तरीही, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने आजवर एकदाही टी२० विश्वचषक जिंकलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

“आजही सामना जिंकून देऊ शकतो,” वनडे-टी२० पुनरागमनाबद्दल अश्विनचे मोठे भाष्य

एका पराभवाने झाला होता इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू, पाकिस्तानी संघावर लागला होता मर्डरचा आरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---