भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विन याने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत महत्वाची भूमिका बजावली होती. त्याने अक्षर पटेलसोबत मिळून इंग्लंड संघाच्या फलंदाजांना रडकुंडीला आणले होते. या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने तब्बल ३२ गडी बाद केले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याला मालिकावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. त्यामुळे अश्विन टी-२० आणि वनडे संघात पुनरागमन करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. यावर अश्विनने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर तो टी-२० आणि वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल असे म्हटले जाते होते. यावर अश्विनने म्हटले, “जेव्हा कोणी मला विचारत की, वनडे आणि टी-२० संघात केव्हा पुनरागमन करणार? तेव्हा मला हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. कारण मी सध्या जसा राहत आहे तसाच ठीक आहे. मी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीपासून संतुष्ट आहे”
तसेच अश्विन पुढे म्हणाला, “कधीतरी अशी एक वेळ येते, जेव्हा तुम्हाला स्वतःसोबतच प्रतिस्पर्धा करावी लागते. परंतु मला माझे आयुष्य संतुलित कसे ठेवायचे हे माहीत आहे. तसेच मला हेदेखील माहीत आहे की, स्वतःसोबत प्रतिस्पर्धा कशी करायची? परंतु जेव्हाही मला मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळायची संधी मिळेल; तेव्हा मी संघाला नक्कीच विजय मिळवून देऊ शकतो.”
अश्विनने २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा मर्यादित षटकांचा सामना खेळला होता. त्यांनतर तो सातत्याने कसोटी क्रिकेट खेळत आहे. यासोबतच तो आयपीएलदेखील खेळत आहे. परंतु गेल्या ४ वर्षांपासून त्याला वनडे किंवा टी२० क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
एका पराभवाने झाला होता इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू, पाकिस्तानी संघावर लागला होता मर्डरचा आरोप
आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी२० लढत; मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताने ‘या’ चुका टाळणे गरजेचे
राहुल संघात कायम, तर आयपीएलचा धडाकेबाज अष्टपैलू करणार पदार्पण? ‘अशी’ असेल भारताची प्लेइंग XI






