---Advertisement---

युवा गोलंदाजाने धोनीला केलं बोल्ड, दूर उडून पडली दांडी; व्हिडिओ होतोय व्हायरल  

On: गुरूवार, मार्च 18, 2021 11:36 AM
---Advertisement---

येत्या ९ एप्रिलपासून आयपीएल २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. गतवर्षी आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला गेला होता. मात्र यंदाचा चौदावा हंगाम भारतातच होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संघांनी आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील ११ मार्च रोजी, सरावाला सुरुवात केली आहे. अशातच मैदानावर सराव करत असतानाचा एमएस धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

चेन्नई सुपर किंग्स संघाने चेपॉकच्या मैदानावर येत्या आयपीएल स्पर्धेसाठी जोरदार सराव सुरू केला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये धोनी फलंदाजी करताना दिसत आहे. तसेच युवा गोलंदाज हरीशंकर रेड्डी छोटा रनअप घेत धावत येतो. त्याच्या चेंडूवर शॉट खेळण्यापुर्वीच चेंडू जाऊन यष्टीला लागतो आणि यष्टी उडून दूर पडते. हे पाहून धोनीही थक्क होतो. दुसरीकडे आपण चक्क धोनीची दांडी गुल केल्यामुळे हरीशंकर रेड्डीला खूप आनंद झालेला पाहायला मिळत आहे.

हरीशंकर रेड्डीला चेन्नई संघाने २० लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. २२ वर्षीय रेड्डीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एमएस धोनीसोबत क्लिक केलेला सेल्फी पोस्ट केला आहे. तसेच त्याने कॅप्शनमध्ये ‘ड्रीम पीक’ असे लिहिले आहे.

https://twitter.com/KiRAN_RCB/status/1372213099164364805?s=20

https://www.instagram.com/p/CMhhJoHnDVJ/?utm_source=ig_web_button_share_sheet

हरीशंकर रेड्डीची कामगिरी

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये आंध्रप्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हरीशंकर रेड्डीने आतापर्यंत खेळलेल्या एकूण ५ लिस्ट ए सामन्यात ८ गडी बाद केले आहेत. तर १३ देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्ये त्याने १९ गडी बाद केले आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्याने गुजरात संघाविरुद्ध ६० धावा देत ३ गडी बाद केले होते. तर झारखंडविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३० धावा देत ४ गडी बाद केले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

“आजही सामना जिंकून देऊ शकतो,” वनडे-टी२० पुनरागमनाबद्दल अश्विनचे मोठे भाष्य

एका पराभवाने झाला होता इंग्लंडच्या खेळाडूचा मृत्यू, पाकिस्तानी संघावर लागला होता मर्डरचा आरोप

आज इंग्लंडविरुद्ध चौथी टी२० लढत; मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताने ‘या’ चुका टाळणे गरजेचे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---