सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भारतीय संघातील पदार्पणाबाबत बरीच चर्चा सुरू आहे. वैभवचा गेल्या तीन टी20 सामन्यांच्या संघात समावेश असूनही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, भारताचा दिग्गज माजी फलंदाज आणि प्रशिक्षक राहुल द्रविडचा Rahul Dravid son धाकटा मुलगा अन्वय Anvay Dravid याने ‘भारत 19-वर्षांखालील’ (India Under-19) संघाकडून Anvay Dravid debut पदार्पण केले आहे. अन्वयने श्रीलंका 19-वर्षांखालील संघाविरुद्धच्या सामन्यातून हे पदार्पण केले. कर्णधार यशवर्धन चौहानच्या नेतृत्वाखालील संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.
विशेष म्हणजे, अन्वय द्रविड हा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. कनिष्ठ स्तरावरील क्रिकेटमध्ये सातत्याने प्रभावी कामगिरी केल्यामुळे त्याची ‘अंडर 19’ संघात Under 19 cricket निवड झाली. यापूर्वी, गेल्या वर्षी त्याला अफगाणिस्तान अंडर 19 संघाविरुद्ध ‘भारत ‘बी’ अंडर 19′ संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्या सामन्यात तो खाते न उघडताच बाद झाला असला, तरी त्याने आपल्या यष्टिरक्षणाच्या कौशल्याने आणि दोन झेल टिपून सर्वांची मने जिंकली होती.
अन्वय द्रविडची ओळख सध्या त्याच्या स्वतःच्या खेळापेक्षा राहुल द्रविडचा मुलगा म्हणून अधिक आहे. त्याने नुकतेच ‘विनू मंकड ट्रॉफी’च्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटक संघाचे नेतृत्व केले होते, ही बाब फार कमी लोकांना माहित आहे. त्या स्पर्धेत त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. कर्नाटकसाठी खेळताना त्याने सहा डावांत एकूण 220 धावा केल्या ज्यामध्ये त्याची 55 ची सरासरी होती. तसेच, तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर राहिला.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा अंडर 19 एकदिवसीय संघ:
यशवर्धन सिंग चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), विनीत व्ही.के., वुटकुर यशवीर गौड, रोहित अनिल यादव, शाविन व्ही., काव्य पारस पटेल, अर्जुन राजपूत, कुशाग्र ओझा, रजत बघेल (यष्टिरक्षक), अन्वय द्रविड (यष्टिरक्षक), सागर विर्क, अनमोलजित सिंग, मोहित उल्वा, ईशान सूद.






