भारत आणि इंग्लंड (T20 series between India vs England) यांच्यात सुरू असलेल्या टी20 मालिकेतील दुसरा सामना मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यातून 15 वर्षांचा भारतीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi made his t20 debut against England) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. ही पदार्पणाची कॅप मिळताच वैभवने सचिन तेंडुलकरचा एक मोठा विक्रम मोडीत काढला आहे. (Vaibhav suryavanshi also break the Sachin Tendulkar’s record)
आता तो भारतीय पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने वयाच्या 15 वर्षे 99 व्या दिवशी हे पदार्पण केले. त्याला तिलक वर्माच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्यात आली.
याआधी हा विक्रम महान सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचिन यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध वयाच्या 16 वर्षे 205 व्या दिवशी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. वैभवने तब्बल 37 वर्षे जुना हा विक्रम मोडला आहे. आयर्लंड मालिकेपासूनच चाहते त्याच्या पदार्पणाची वाट पाहत होते.
भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारे खेळाडू!
15 वर्षे 99 दिवस: वैभव सूर्यवंशी (विरुद्ध इंग्लंड, 2026)
16 वर्षे 205 दिवस: सचिन तेंडुलकर (विरुद्ध पाकिस्तान, 1989)
17 वर्षे 75 दिवस: पियुष चावला (विरुद्ध इंग्लंड, 2006)
17 वर्षे 118 दिवस: एल. शिवरामकृष्णन (विरुद्ध वेस्ट इंडिज, 1983)
17 वर्षे 152 दिवस: पार्थिव पटेल (विरुद्ध इंग्लंड, 2002)
17 वर्षे 193 दिवस: मनिंदर सिंग (विरुद्ध पाकिस्तान, 1982)
वैभव सूर्यवंशी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याने शानदार कामगिरी करत 776 धावा केल्या आणि ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला होता. तसेच, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी केली होती. या सातत्यपूर्ण कामगिरीमुळेच त्याला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतही तो चमकदार कामगिरी करेल, अशी चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.






