---Advertisement---

IND vs ENG: टीम इंडियाची चिंता वाढली! दुसऱ्या टी-20वर पावसाचं संकट?

On: शनिवार, जुलै 4, 2026 9:26 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड IND vs ENG यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील 5 Matches T20 Series पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. आता भारतीय चाहते दुसऱ्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

चेस्टर-ले-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 189 धावा केल्या होत्या. मात्र, पावसामुळे व्यत्यय आल्याने सामना पूर्ण होऊ शकला नाही. आता सर्वांचे लक्ष मँचेस्टर येथे होणाऱ्या दुसऱ्या टी-20 सामन्याकडे लागले आहे. चला तर मग, या सामन्यासाठी Weather Report हवामानाचा अंदाज जाणून घेऊया.

‘अक्युवेदर’च्या (AccuWeather) अंदाजानुसार, शनिवारी मँचेस्टरमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. सामना सुरू होण्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीच्या भागात पावसाची 57% शक्यता आहे. तसेच आकाश ढगाळ राहण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे नाणेफेकीला (TOSS UPDATE) उशीर होऊ शकतो. सामन्यादरम्यान विशेषतः दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत पावसाची 51% शक्यता आहे. परिणामी, सामना थांबवावा लागू शकतो किंवा षटकांची संख्या कमी करावी लागू शकते. मात्र, पहिल्या सामन्याच्या ठिकाणापेक्षा मँचेस्टरचे मैदान अधिक सुसज्ज आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे, पाऊस थांबल्यानंतर काही वेळातच मैदान खेळासाठी सज्ज केले जाऊ शकते. त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे, जी चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना आज (4 जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे खेळला जाईल. दोन्ही संघांचे लक्ष्य हा सामना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेण्याचे असेल. पावसामुळे पहिला सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि केवळ पहिलीच इनिंग खेळली गेली. त्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार अर्धशतके झळकावली, ज्यामुळे भारताला 7 बाद 189 धावांची मजल मारता आली. त्यांच्याव्यतिरिक्त शिवम दुबेनेही आक्रमक फलंदाजी करत मोलाचे योगदान दिले. मात्र, आयर्लंड मालिकेपासून संजू सॅमसनला धावा करता आलेल्या नाहीत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---