---Advertisement---

वैभव सूर्यवंशीच्या इंस्टाग्राम स्टोरीने खळबळ! दुसऱ्या टी-20 आधी पदार्पणाचे संकेत?

On: शनिवार, जुलै 4, 2026 7:28 AM
---Advertisement---

15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची भारतीय टी20 संघात निवड झाल्यापासून क्रिकेट विश्वात एकच प्रश्न चर्चिला जात आहे, त्याला नेमकी कधी पदार्पणाची संधी मिळेल? Vaibhav Sooryavanshi Debut अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी असा अंदाज वर्तवला होता की, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला पहिली संधी मिळेल. मात्र, संघ व्यवस्थापनाची योजना काही वेगळीच होती.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघात मोठे बदल न करण्याचा निर्णय घेतला. Vaibhav Sooryavanshi Team India परिणामी, 2026चा टी20 विश्वचषक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूंवरच त्यांनी आपला विश्वास कायम ठेवला. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातही वैभवला ‘बेंच’वरच राहावे लागले. सलग अपयश येत असूनही संजू सॅमसनला संधी देण्यात आली.

भारत आणि इंग्लंड IND vs ENG यांच्यातील दुसरा टी20 सामना शनिवारी (4 जुलै) मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे होणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते, अशी चर्चा जोर धरत आहे.

त्याने शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीमुळे Vaibhav Sooryavanshi Instagram Story या चर्चेला सुरुवात झाली आहे. वैभवने एक फोटो शेअर केला आहे ज्यात तो जल्लोष करताना दिसत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचे खेळाडू दिसत आहेत आणि वरच्या बाजूला असलेल्या स्कोरबोर्डवर ‘Final’ असे लिहिले आहे. त्याने या फोटोला “New Chapter” (नवीन अध्याय) असे कॅप्शन दिले आहे, ज्यामुळे चाहत्यांनी याचा अर्थ त्याच्या आगामी आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे संकेत असा लावला आहे.

विशेष म्हणजे, हा फोटो भारत आणि इंग्लंड यांच्यातील ‘अंडर-19 विश्वचषक’ अंतिम सामन्यातील आहे. त्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने धडाकेबाज खेळी करत अवघ्या 80 चेंडूत 175 धावा केल्या होत्या आणि भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला होता. त्याच्या या खेळीत 15 षटकार आणि 15 चौकारांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर, वरिष्ठ संघातही त्याच्या पदार्पणाबाबत मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, मॉर्ने मॉर्केल यांचे संकेत वेगळे आहेत.

वैभवच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पदार्पणाबाबत चर्चा रंगल्या असल्या तरी, सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्केलने मात्र वेगळेच संकेत दिले. दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मॉर्केल म्हणाला, “आमच्याकडे अभिषेक शर्मासारखा उच्च दर्जाचा टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसन हा देखील विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे आणि त्याने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे, प्रशिक्षक म्हणून खेळाडूंवर विश्वास ठेवणे आणि त्यांना पाठिंबा देणे योग्यच आहे. होय, एक युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहे आणि ही एक सकारात्मक बाब आहे. तरीही, आम्ही आमच्या खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे केवळ या दोघांवरच नाही, तर संपूर्ण संघावर.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---