कोरोना व्हायरसदरम्यान संयुक्त अरब अमिरातीत आयोजित करण्यात आलेला इंडियन प्रीमियर लीग २०२०चा रनसंग्राम संपला. गतवर्षी विजेता ठरलेला मुंबई इंडियन्स संघच यावर्षीही ट्रॉफीचा दावेदार ठरला. यानंतर आता बीसीसीआय आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या तयारीला लागले आहे. अशात पुढील वर्षी आयपीएलमध्ये एका नव्या संघाचे आगमन होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
सन २००८ साली श्रीगणेशा झालेल्या आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ तीन हंगामात आठपेक्षा जास्त संघ खेळले आहेत. आता आयपीएल २०२१ मध्येही बीसीसीआय स्पर्धेमध्ये एका नव्या संघाची भर घालण्याच्या विचारात आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, आयपीएलच्या फ्रँचायझींना अनधिकृतपणे संकेत देण्यात आले आहे की पुढील वर्षी मोठ्या लिलावाचे आयोजन करण्यात येईल. कोरोना व्हायरसमुळे बीसीसीआयला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. तसेच एका मोठ्या कंपनीने या नव्या फ्रंचायझीला विकत घेण्यासाठी रुची दाखवली असल्याचे म्हटले जात आहे. पुढील वर्षी भारतात आयपीएल २०२१चे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब चपला धुवत असताना विराट कोहली कॅमेरात कैद; अनुष्का म्हणाली, ‘दौऱ्यावर जाण्या अगोदर…’
प्रसिद्ध टॉलीवूड अभिनेत्रीसोबत डेविड वॉर्नरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
आयपीएल २०२१: किंग्ज इलेव्हन पंजाब संघ ‘या’ खेळाडूची करणार हाकालपट्टी?
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२०: एकेकाळी मैदान गाजवणारे ५ मोठे खेळाडू; या हंगामात ठरले सपशेल फ्लॉप
कोट्यवधी रुपयात विकत घेऊनही ‘या’ ५ परदेशी खेळाडूंना संघात दिली नाही संधी; एकाने गाजवलायं मागील हंगाम
आयपीएल २०२०मधील ५ खेळाडू; ज्यांनी सिंहाचा वाटा उचलत गाजवले मैदान