भारताबरोबरच संपूर्ण जगभरातील क्रीडा स्पर्धा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित किंवा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारतातील सर्वात मोठी टी२० स्पर्धा आयपीएलला १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. परंतु आयपीएलबद्दल बीसीसीआयने आतापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
बीसीसीआय आणि फ्रंचायझी प्रतिनिधी यांच्यात आज (२४ मार्च) कॉन्फरन्स कॉलच्या साहाय्याने होणाऱ्या बैठकीत आयपीएल २०२०च्या (IPL2020) भविष्यावर निर्णय घेण्यात येईल.
या बैठकीपूर्वी क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची (Good News) बातमी आहे. जर आयपीएलचा पहिला सामना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाला, तर या सामन्याचे आयोजन बीसीसीआय करू शकते.
बीसीसीआयनुसार, जर कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) बिघडलेल्या परिस्थितीमध्ये एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सुधारणा झाली तर, आयपीएलचे आयोजन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केले जाऊ शकते.
या आयोजनासाठी बीसीसीआय आयपीएल २००९चा फॉर्मूला वापरू शकते. त्यावेळी आयपीएलचे केवळ ३७ दिवसांमध्ये ५९ सामने खेळवण्यात आले होते. जर आयपीएलचे आयोजन मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झाले नाही, तर आयपीएलचे आयोजन करणे कठीण होईल.
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे बिघडलेली परिस्थिती एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत ठीक झाली. तर आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात येतील.
मुंबईतील ३ आणि पुण्याच्या एका स्टेडियममध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. यामुळे खेळाडूंच्या प्रवासाचा वेळ वाचले आणि एक दिवसानंतरही सामने खेळता येतील.
मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), ब्रेबॉर्न स्टेडियम (Brabourne Staium), डी. वाय. पाटील स्टेडियम (D.Y. Patil Stadium) आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) या स्टेडियममध्ये सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते. यापुर्वीही महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर आयपीएलचे अनेक सामने झाले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय
-जेन्हा सचिन विराटने १० हजार धावांचा टप्पा पार केला तेव्हा घडले होते बाप योगायोग
-रोहित-विराटमध्ये हा होणार हर्षल गिब्जचा क्वॉरंटाईन पार्टनर