भारतात कोव्हिड-१९ रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही एक चिंतेची बाब आहे. अनेक राज्यांमध्ये टाळेबंदीची देखील घोषणा करण्यात आली आहे. सर्व काही बंद होत असताना,याचा परिणाम क्रिकेटवर देखील होताना पाहायला मिळत आहे. कोव्हिड-१९ संसर्ग वाढत असल्यामुळे बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाची स्पर्धा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
कोव्हीड-१९ संसर्गाला २०२० पासून सुरुवात झाली होती. त्यानंतर सर्वच काही ठप्प पडले होते. त्यांनतर वर्षाखेरीस हळूहळू सर्व सुरळीत होत होते. मात्र या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा संसर्ग वाढत असल्यामुळे बीसीसीआयने सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यात विनू मंकड १९ वर्षाखालील स्पर्धेचा देखील समावेश आहे. तसेच या स्पर्धा आयपीएल २०२१ नंतर खेळवण्याचा विचार करू, असे देखील बीसीसीसायतर्फे स्पष्ट केल्या गेले आहे.
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेनंतर विनू मंकड स्पर्धा खेळवण्यात येणार होती. परंतु ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबत बोलतांना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “या वेळेस राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. वयोगटातील स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायचा असतील. सद्य स्थिती पाहता स्पर्धा घेणे योग्य दिसत नाहीये.”
जय शाह यांनी एक पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “जर वयोगटातील स्पर्धा खेळवण्यात आली तर खेळाडूंना एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागेल. यामध्ये त्यांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तसेच त्यांना बायो बबलमध्ये राहावे लागेल. जे आत्ताच्या घडीला शक्य दिसत नाहीये.”
तसेच ते पुढे म्हणाले, “आमच्यासाठी खेळाडूंचे आरोग्य महत्वाचे आहे.मी तुम्हाला विश्वासाने सांगू इच्छितो की, आयपीएल २०२१ स्पर्धेनंतर वयोगटातील स्पर्धांसाठी एक योग्य वेळ निवडली जाईल.” त्यामुळे आता युवा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधील या स्पर्धेसाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
किंग कोहलीचा मोठा पराक्रम! या विक्रमाच्या यादीत सचिन, धोनीला मागे टाकत पटकावले अव्वल स्थान
तिसऱ्या टी२० सामन्यातील पराभवानंतर कोहली निराश होत म्हणाला, माझ्या खेळीचा काय उपयोग, जर