ऑस्ट्रेलियानंतर आता भारतीय क्रिकेटमध्येही कोरोनाने प्रवेश केला आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगाल संघाचे ६ खेळाडू आणि एका सहाय्यक प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर मंगळवारी (०४ जानेवारी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोठा निर्णय घेत रणजी ट्रॉफी स्पर्धा स्थगित केली आहे. याबरोबरच कर्नल सीके नायडू ट्रॉफी आणि वरिष्ठ महिला टी२० २०२१-२२, या देशांतर्गत स्पर्धाही पुढे ढकलल्या आहेत.
मात्र १४ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेली कूच बिहार ट्रॉफी स्पर्धा पूर्ण करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ही स्पर्धा ७ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल.
🚨 NEWS 🚨: BCCI postpones Ranji Trophy, Col C K Nayudu Trophy & Senior Women’s T20 League for 2021-22 season.
The ongoing Cooch Behar Trophy will continue as scheduled.
More Details ⬇️https://t.co/YRhOyk6680 pic.twitter.com/PvrlZZusSF
— BCCI (@BCCI) January 4, 2022