भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या जुलै महिन्यात द्विपक्षीय मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन टी-२० आणि तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा रंगली आहे की, या दौऱ्यावर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार आहेत. परंतु याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नव्हती. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत अधिकृतरित्या जाहीर केले आहे की, श्रीलंका दौऱ्यावर राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असणार आहेत.
सौरव गांगुली यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राहुल द्रविड श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहेत.”
तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, द्रविडसह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे टी दिलीप आणि पारस महांब्रे हे साहाय्यक प्रशिक्षक असणार आहेत. द्रविड यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे कारण हा दौरा सुरू असताना विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेसाठी सराव करण्यात व्यस्त असणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री, भरत अरुण आणि विक्रम राठोड हे प्रशिक्षकही त्यांच्यासोबत व्यस्त असतील.
तसेच श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद शिखर धवनला देण्यात आले आहे. तर उप-कर्णधारपद भुवनेश्वर कुमारला देण्यात आले आहे. संघात निवड झालेले खेळाडू १४ जूनपासून मुंबईच्या एका हॉटेलमध्ये विलगिकरणात आहे. १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू श्रीलंकेच्या दिशेने रवाना होणार आहे.
टी२० विश्वचषक आयोजनासंबंधी दिली माहिती
याबरोबरच टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत सौरव गांगुली म्हणाले, “आम्ही भारत सरकारला करामध्ये सूट देण्यात यावी यासाठी पत्र लिहिले आहे. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत. आमच्याकडे अजूनही वेळ आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत निर्णय घेईल.”
भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणे कठीण दिसून येत आहे. बीसीसीआयने युएईला पर्याय म्हणून ठेवले आहे. तसेच याबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीसीआयला २८ जूनपर्यंतचा अवधी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिलीवहिली कसोटी चॅम्पियनशीप जिंकण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह भारतीय संघ उतरणार मैदानावर!
मुंबईत जन्मलेला ‘हा’ फिरकीपटू भारतीयांची उडवणार दाणादाण, न्यूझीलंडच्या अंतिम संघात मिळाली जागा