भारताचे दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआयचा) अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ही जबाबदारी मिळाल्यापासून त्यांनी योग्यरीत्या पार पाडली असल्याचे दिसले आहे. आता ते आणखी एक महत्त्वाचे पद सांभाळणार आहे. त्यांची आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसीच्या) क्रिकेट समीतीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या ९ वर्षांपासून माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळे ही जबाबदारी पार पाडत होते. आता ९ वर्ष झाल्यानंतर सौरव गांगुली यांना हे पद देण्यात आले आहे. सौरव गांगुली यापूर्वी आयसीसीच्या निरिक्षकपदी कार्यरत होते. त्यांचे प्रमुख कार्य म्हणजे खेळाची परिस्थिती आणि नियमांचे निरीक्षण करणे होते.
दरम्यान, सौरव गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बीसीसीआयला आयसीसीकडून दिलासा मिळाला आहे. आयसीसीने २०२४-२०३१ पर्यंत होणाऱ्या आयसीसी स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ज्यामध्ये बीसीसीआयला देखील यजमानपद दिले जाणार आहे. बीसीसीआयला २०२६ टी२० विश्वचषक, २०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०३१ विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद दिले गेले आहे. या सर्व स्पर्धांसाठी आयसीसीने मान्य केले आहे की, शासनाला देण्यात येणारे १०% कर हे बीसीसीआय नव्हे, तर आयसीसी देणार आहे. ज्यामुळे बीसीसीआयची १५०० कोटी रुपयांची बचत होऊ शकते.
सौरव गांगुली यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक मोठ मोठे विक्रम केले. त्यांनी ११३ कसोटी सामन्यांमध्ये ४२.१७ च्या सरासरीने ७२१२ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये १६ शतक आणि ३५ अर्धशतक झळकावले आहेत. तसेच ३११ वनडे सामन्यांमध्ये ४१. ०२ च्या सरासरीने ११३६३ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये २२ शतक आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ट्रेंट बोल्टने ‘या’ कारणाने घेतली माघार
भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिल्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!