---Advertisement---

रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार? सौरव गांगुलीने दिले ‘हे’ उत्तर

On: मंगळवार, नोव्हेंबर 3, 2020 2:49 PM
---Advertisement---

भारतीय संघ आयपीएल २०२० नंतर लगचेच युएईमधूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. मात्र, या दौऱ्यासाठी निवडलेल्या एकाही भारतीय संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नाही. त्याला आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघात निवडले गेले नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. आता बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने यावर भाष्य केले आहे.

हिंदूस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने म्हटले आहे की जर रोहित शर्माने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याच्याबद्दल निवड समीती पुन्हा विचार करेल.

गांगुली म्हणाला, ‘ रोहितबद्दल सांगायचे झाल्यास, आपल्याला तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त व्हावा असे वाटत आहे. पुढे तो जर तंदुरुस्त झाला, तर मला खात्री आहे निवडकर्ते त्याच्याबद्दल पुन्हा विचार करतील.’

रोहित आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या मागील काही सामन्यातही हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळलेला नाही. पण तो मुंबई इंडियन्ससह नेटमध्ये सराव करत आहे, त्याच्या सरावाचे फोटो आणि व्हिडिओ मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यामुळे नक्की रोहितची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

इशांतच्या तंदुरुस्तीवरही आहे प्रश्नचिन्ह 

रोहित व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज इशांत शर्माच्या तंदुरुस्तीवरही प्रश्नचिन्ह आहे. त्याचाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यालाही आयपीएल दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे तो आयपीएलच्या १३ व्या हंगामातून बाहेर पडला होता. तसेच युएईमधून तो भारतात परतला आहे.

पण जर रोहित आणि इशांत दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेआधी तंदुरुस्त झाले तर त्यांचा नक्कीच भारतीय संघात समावेश करण्यात येईल, असे गांगुलीने स्पष्ट केले आहे.

तो म्हणाला, ‘सध्या आम्ही इशांत आणि रोहितवर लक्ष ठेवून आहोत. इशांत संघातून पूर्णपणे बाहेर गेलेला नाही. तो कसोटी मालिकेचा भाग बनू शकतो.’

तसेच गांगुली म्हणाला की भारतीय संघ आधी ऑस्ट्रेलियाला गेला आणि जरी जैवसुरक्षित वातावरण आणि क्वारंटाईनचे नियम असले तरी रोहित आणि इशांतला नंतर ऑस्ट्रेलियाला पाठवले जाऊ शकते.

त्याचबरोबर गांगुली या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल म्हणाला की जरी ऑस्ट्रेलिया कठिण प्रतिस्पर्धी असला तरी भारतीय संघात विजय मिळवण्याची क्षमता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबईच्या लढवय्या खेळाडूची ११ वर्षांची प्रतिक्षा काही संपेना, पुन्हा नाकारली टीम इंडियात जागा

टीम इंडियाचा उपकर्णधार झाला ‘हा’ खेळाडू, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात घेतली रोहितची जागा

-आतुरता संपली ! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेचे वेळापत्रक जाहीर ; पाहा कुठे आणि कधी खेळले जातील सामने

ट्रेंडिंग लेख –

IPL – धोनी पुढील हंगाम खेळणार, परंतु ‘हे’ खेळाडू होऊ शकतात चेन्नई संघातून बाहेर

वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---