---Advertisement---

शास्त्रींचा पुस्तक प्रकाशन सोहळा की आयपीएल? अंतिम कसोटी रद्द होण्यामागील खऱ्या कारणाचा गांगुलीकडून खुलासा

On: सोमवार, सप्टेंबर 13, 2021 3:28 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर पार पडणार होता. परंतु कोरोनाच्या भितीने भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर अनेकांनी या निर्णयामागील कारणांसंबंधी तर्क वितर्क लावले आहेत. अनेकांनी सामना न होण्यामागे आयपीएल स्पर्धेला कारणीभूत ठरवले आहेत. तर काहींचे म्हणणे आहे की, रवी शास्त्रींनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसती, तर असे काही झालेच नसते.

परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. दरम्यान आता या प्रकरणावर खूपच वादविवाद सुरू असताना सौरव गांगुली यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सौरव गांगुली यांनी म्हटले की, “खेळाडूंनी कसोटी सामना खेळण्यास नकार दिला, याबद्दल तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही. फिजिओ योगेश परमार हा खेळाडूंच्या अगदी जवळचा होता. नितीन पटेल यांचा विलगीकरणाचा कालावधी सुरू असताना योगेश परमार हा खेळाडूंसोबत स्वतंत्रपणे फिरत होता. यासह त्याने खेळाडूंच्या कोरोनाची चाचणी देखील केली होती. तसेच तो त्यांची मालिशही करायचा, तो त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होता.”

ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी योगेश परमारचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

“खेळाडू घाबरले होते. जेव्हा त्यांना कळाले की, योगेश परमारचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. खेळाडूंच्या मनात भीती निर्माण झाली होती की, त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. बायो बबलमध्ये राहणं इतकं सोपं नसतं. तुम्ही त्यांच्या भावनांचा सन्मान करायला हवा,” असे सौरव गांगुली म्हणाले.

सौरव गांगुली यांचे स्पष्ट मत आहे की, सर्वकाही शांत झाल्यावर रद्द झालेल्या कसोटी सामन्यावर चर्चा करण्यात येईल. सौरव गांगुली यांचे देखील म्हणणे असेच आहे की, एकमेव कसोटी सामना खेळला गेला तर, तो मालिकेचा भाग नसेल. ते म्हणाले की, “ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. त्यांना देखील याचे नुकसान झाले आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डासाठी ही गोष्ट सोपी नसेल. सर्व शांत होऊद्या मग त्यानंतर चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. पुढच्या वर्षी जेव्हा हा कसोटी सामना आयोजित केला जाईल, तेव्हा फक्त एक कसोटी सामना आयोजित केला जावा कारण ही मालिका आणखी मोठी होऊ शकत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

मंकडिंग क्विन…! पदार्पणाच्या सामन्यात १६ वर्षीय क्रिकेटरने मंकडिंग पद्धतीने ४ फलंदाजांना धाडले तंबूत

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची ‘गुगली’, सर्व इंग्लिश खेळाडूंना आयपीएलमधून माघार घेण्यास पाडले भाग!

वोक्सच्या जागी DC मध्ये ‘या’ गोलंदाजाची निवड, टी२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्सची केलीय कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---